2 थेस्सल 1:6-10
2 थेस्सल 1:6-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. आपल्या पवित्रजनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून आणि त्यादिवशी पवित्रजनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे.
2 थेस्सल 1:6-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर न्यायी आहे: जे तुम्हाला त्रास देतात त्यांची परतफेड ते त्रासांनी करतील. प्रभू येशू अग्निज्वालेमधून, आपल्या महाप्रतापी दूतांसह स्वर्गातून प्रकट होतील आणि त्रास सहन करणार्या तुम्हाला व आम्हालाही विश्रांती देतील. जे परमेश्वराला ओळखत नाहीत आणि आपल्या प्रभू येशूंचे शुभवार्ता पाळत नाही त्यांना ते शिक्षा देतील. सर्वकाळचा नाश ही त्यांची शिक्षा असेल आणि ते प्रभुच्या समक्षतेतून व परमेश्वराच्या गौरव व सामर्थ्यातून कायमचे विभक्त होतील. त्यांच्या आगमनाच्या दिवशी ते आपल्या पवित्र लोकांमध्ये गौरविले जातील आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांना आश्चर्यचकित करण्यासाठी येतील. यामध्ये तुमचा सहभाग आहे कारण आमची जी साक्ष तुम्हाला दिली त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.
2 थेस्सल 1:6-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुमच्यावर संकट आणणार्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणार्या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल; तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. आपल्या पवित्र जनांच्या ठायी गौरव मिळावा म्हणून, आणि त्या दिवशी विश्वास ठेवणार्या सर्वांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.
2 थेस्सल 1:6-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुमच्यावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हांला आमच्याबरोबर संकटातून मुक्त करणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे. प्रभू येशू प्रकट होईल, तेव्हा तो हे सिद्धीस नेईल. येशू त्याच्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूचे शुभवर्तमान मानत नाहीत, त्यांचा तो सूड उगवील. त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या गौरवशाली सामर्थ्यापासून दूर करण्यात येऊन शाश्वत विनाश ही शिक्षा मिळेल. त्या दिवशी आपल्या पवित्र लोकांकडून गौरव मिळविण्यासाठी आणि विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी अचंबित व्हावे म्हणून तो येईल. तुम्हीही त्यात सहभागी व्हाल कारण आम्ही दिलेल्या संदेशावर तुम्ही विश्वास ठेवला आहे.