२ शमुवेल 15:13-17
२ शमुवेल 15:13-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
एका निरोप्याने दाविदास वर्तमान सांगितले की इस्राएलच्या लोकांचा कल अबशालोमकडे झुकत आहे. तेव्हा यरूशलेमेमध्ये आपल्या भोवती असलेल्या सर्व सेवकांना दावीद म्हणाला, आता आपण पळ काढला पाहिजे. आपण येथून निसटलो नाही तर अबशालोमच्या तावडीत सापडू. त्याने पकडायच्या आतच आपण तातडीने निघून जाऊ. नाही तर तो आपल्यापैकी कोणालाही शिल्लक ठेवणार नाही. यरूशलेमेच्या लोकांस तो मारून टाकेल. तेव्हा राजाचे सेवक त्यास म्हणाले, तुम्ही म्हणाल ते करायला आम्ही तयार आहोत. आपल्या कुटुंबातील सर्वांसह राजा बाहेर पडला. आपल्या दहा उपपत्नी होत्या त्यांना त्याने घराचे रक्षण करायला म्हणून मागे ठेवले. राजा आणि त्याच्या मागोमाग सर्व लोक निघून गेले अगदी शेवटच्या घरापाशी ते थांबले.
२ शमुवेल 15:13-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा एका जासुदाने येऊन दाविदाला सांगितले, “इस्राएल लोकांची मने अबशालोमाकडे वळली आहेत.” हे ऐकून दावीद यरुशलेमेतल्या आपल्या सर्व सेवकांना म्हणाला, “चला, आपण पळून जाऊ; न गेलो तर अबशालोमाच्या हातांतून कोणी सुटायचा नाही, निघून जाण्याची त्वरा करा, नाहीतर तो अचानक आपल्याला पकडून आपल्यावर अरिष्ट आणील व शहरावर तलवार चालवील.” राजाचे सेवक त्याला म्हणाले, “पाहा, स्वामीराज, राजाच्या मनास येईल त्याप्रमाणे करायला आपले दास तयार आहेत.” मग राजा निघून गेला व त्याच्यामागून त्याच्या घरची माणसे गेली. त्याच्या ज्या दहा स्त्रिया उपपत्नी होत्या त्यांना घर सांभाळायला ठेवून तो गेला. राजा निघाला तेव्हा सर्व लोक त्याच्यामागून गेले व ते बेथ-मरहाक येथे थांबले.