2 पेत्र 1:20-21
2 पेत्र 1:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही प्रथम हे जाणा की, शास्त्रलेखातील कोणताही संदेश स्वतः अर्थ लावण्यासाठी झाला नाही. कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.
2 पेत्र 1:20-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
सर्वात महत्वाचे, प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा संदेष्ट्यांच्या स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही. कारण भविष्यकथन मनुष्यांच्या इच्छेने कधी झालेले नाही, तर संदेष्ट्यांनी, जरी ते मनुष्य होते तरी पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन परमेश्वराकडून आलेला संदेश सांगितला आहे.
2 पेत्र 1:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रथम हे ध्यानात ठेवा की, शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही; कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.
2 पेत्र 1:20-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रथम हे ध्यानात ठेवा की, धर्मशास्त्रातील कोणत्याही परमेश्वरप्रेरित संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने करता येत नाही. कारण परमेश्वरप्रेरित संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही. तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश सांगितला आहे.