YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 पेत्र 1:2-15

2 पेत्र 1:2-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हास कृपा व शांती विपुल मिळत राहो. देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. त्यांच्यायोगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत; ह्यासाठी की, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून दैवी स्वभावाचे भागीदार व्हावे. ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात सहनशीलता आणि सहनशीलतेला सुभक्ती, आणि सुभक्तीत बंधुप्रीतीची व बंधुप्रीती मध्ये प्रीतीची भर जोडा. कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निरुपयोगी व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील. ज्याच्या ठायी या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे; अदूरदृष्टीचा आहे, त्यास आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे; म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही. आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल. या कारणास्तव, जरी तुम्हास या गोष्टी माहित आहेत आणि प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झाला आहा, तरी तुम्हास त्यांची नेहमीच आठवण देण्याची काळजी घेईन. मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला योग्य वाटते. कारण मला माहीत आहे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मला कळवल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल. आणि माझे निघून जाणे झाल्यानंतरही या गोष्टी, सतत तुमच्या स्मरणात रहाव्या म्हणून शक्य तितके करीन.

सामायिक करा
2 पेत्र 1 वाचा

2 पेत्र 1:2-15 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

परमेश्वर आणि आपला येशू प्रभू यांच्या ज्ञानाद्वारे कृपा व शांती तुम्हाला अधिकाधिक प्राप्त होवो. त्यांच्या दैवी सामर्थ्याने तुम्हाला त्यांच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यास पाचारण केले, त्यांच्या ज्ञानाद्वारे जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्वगोष्टी आपल्याला दिल्या आहेत. याद्वारे त्यांनी आपल्याला त्यांचे अतिमहान आणि मोलवान अभिवचने दिली आहेत, यासाठी की त्याद्वारे त्यांच्या दैवीस्वभावात आपण सहभागी व्हावे व जगाच्या भ्रष्टतेतून निर्माण होणार्‍या वाईट वासनेपासून आपली सुटका व्हावी. कारण याच कारणासाठी, तुमच्या विश्वासामध्ये चांगुलपणाची भर घालण्याचा प्रयत्न करा; चांगुलपणात ज्ञानाची; ज्ञानात आत्मसंयमाची; आत्मसंयमात धीराची; धीरात सुभक्तीची; सुभक्तीत बंधुप्रेमाची; बंधुप्रेमात प्रीतीचा. कारण जर हे गुण तुमच्यामध्ये वाढत असले तर ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्ञानात तुम्हाला अपरिणामकारी व असफल होण्यापासून राखतील. ज्याच्याजवळ हे गुण नाहीत तो दूरदृष्टी नसलेला आणि आंधळा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापापासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. यास्तव, माझ्या बंधू आणि भगिनींनो तुमचे पाचारण आणि निवड दृढ करण्यासाठी होईल तितके प्रयत्न करा. असे केल्यास तुम्ही कधीही अडखळणार नाही किंवा तुमचे पतन होणार नाही, तर आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या शाश्वत राज्यात भव्य तुमचे स्वागत होईल. जरी तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत, आणि तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सत्यात निश्चितपणे स्थिर झालेले आहात तरी या गोष्टींची मी तुम्हाला नेहमीच आठवण करून देईन. मला असे वाटते की, जोपर्यंत मी या शारीरिक तंबूमध्ये राहत आहे तोपर्यंत तुमची स्मरणशक्ती ताजीतवानी करणे हे योग्य आहे; कारण मला माहीत आहे की मी लवकरच हा शारीरिक मंडप सोडणार आहे जसे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला स्पष्ट करून दिले आहे. माझे निर्गमन झाल्यावर या गोष्टींची तुम्हाला सतत लक्षात राहतील यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

सामायिक करा
2 पेत्र 1 वाचा

2 पेत्र 1:2-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो. ज्याने तुम्हाआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्त्विकते-साठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत; त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्त्विकतेची, सात्त्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला; कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हांला करतील. ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, अदूरदृष्टीचा आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. म्हणून बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही; आणि अशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल. ह्या कारणास्तव जरी तुम्हांला ह्या गोष्टी माहीत आहेत आणि तुम्हांला प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहात तरी तुम्हांला त्यांची नेहमी आठवण देण्याची मी काळजी घेईन. मी ह्या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हांला आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला उचित वाटते; कारण मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळवल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे; आणि माझे निर्गमन झाल्यावरही त्या गोष्टींची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य तितके करीन.

सामायिक करा
2 पेत्र 1 वाचा

2 पेत्र 1:2-15 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ज्ञानाद्वारे तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो. ज्याने त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने तुम्हांआम्हांला त्याच्या स्वतःच्या वैभवात व चांगुलपणात सहभागी होण्यासाठी पाचारण केले; त्याच्या ज्ञानाच्या द्वारे जीवनास व धार्मिकतेस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्याच्या योगे मूल्यवान व अतिमहान अशी अभिवचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. ह्याच कारणासाठी तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची, ज्ञानात आत्मनियंत्रणाची, आत्मनियंत्रणात धीराची, धीरात धार्मिकतेची, धार्मिकतेत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला. कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढत असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानात तुम्ही सक्रिय व फलद्रूप व्हाल. ज्याच्या अंगी ते नाहीत तो आंधळा आहे, दूरदृष्टी नसलेला आहे, त्याला आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे. तर मग बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे कधीही पतन होणार नाही आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या शाश्वत राज्यात पूर्ण हक्काने तुमचा प्रवेश होईल. ह्या कारणासाठी जरी तुम्हांला ह्या गोष्टी माहीत आहेत आणि तुम्हांला प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेले आहात तरी मी जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हांला त्याची आठवण देऊन जागृत ठेवणे, हे मला उचित वाटते. मला ठाऊक आहे की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला हे जग लवकरच सोडावे लागणार आहे आणि माझ्या निधनानंतरही ह्या गोष्टीची आठवण सर्वदा तुम्हांला करता यावी म्हणून मी शक्य ती व्यवस्था करीन.

सामायिक करा
2 पेत्र 1 वाचा

2 पेत्र 1:2-15

2 पेत्र 1:2-15 MARVBSI2 पेत्र 1:2-15 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा