२ राजे 8:23-29
२ राजे 8:23-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
योरामाने केलेल्या बाकीच्या गोष्टी व त्याने केलेली सगळी कामे ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? नंतर योराम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला; त्याला दावीदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली; त्याचा पुत्र अहज्या हा त्याच्या जागी राजा झाला. अहाबाचा पुत्र इस्राएलाचा राजा योराम ह्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अहज्या हा राज्य करू लागला. अहज्या राज्य करू लागला तेव्हा तो बावीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या; ही इस्राएलाचा राजा अम्री ह्याची नात. त्याची चालचलणूक अहाबाच्या घराण्यासारखी होती, आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणेच परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण अहाबाच्या घराण्याचा तो जावई होता. तो अहाबाचा पुत्र योराम ह्याच्याबरोबर रामोथ-गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल ह्याच्याशी लढायला गेला; तेव्हा अरामी लोकांनी योरामाला घायाळ केले. योराम राजा हजाएलाशी रामा येथे लढताना अरामी लोकांच्या हातून जे घाय त्याला झाले होते ते बरे व्हावेत म्हणून तो इज्रेल येथे गेला. अहाबाचा पुत्र योराम हा इज्रेल येथे आजारी होऊन पडला होता, म्हणून यहूदाचा राजा यहोराम ह्याचा पुत्र अहज्या त्याच्या समाचाराला गेला.
२ राजे 8:23-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात यहोरामाने जे जे केले त्याची नोंद आहे. यहोराम मरण पावला आणि दावीद नगरात आपल्या पूर्वजांसोबत त्याचे दफन झाले. यहोरामाचा मुलगा अहज्या मग राज्य करु लागला. इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा मुलगा अहज्या यहूदाचा राजा झाला. त्यावेळी अहज्या बावीस वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. इस्राएलचा राजा अम्री याची ती मुलगी. परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबाचा जावई होता. त्यामुळे अहाबाच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती. अहाबाचा मुलगा योराम यासह अहज्या रामोथ-गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल याच्यावर चढाई करून गेला. अराम्यांनी योथामाला जखमी केले. आणि रामा येथे योरामाचा राजा हा अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढत होता, तेव्हा झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी तो परत इज्रेलास गेला. आणि त्यास भेटायला यहूदाचा राजा यहोराम याचा मुलगा अहज्या खाली इज्रेलला अहाबाचा मुलगा योराम ह्याला पाहायला गेला होता.
२ राजे 8:23-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यहोरामाच्या बाकीच्या कामगिरीचा तपशील आणि त्याची सर्व कामे यहूदीयाच्या राजांच्या इतिहास या ग्रंथात केलेली नाही काय? यहोराम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि तो त्यांच्याबरोबर दावीदाच्या नगरात पुरला गेला आणि वारस म्हणून त्याचा पुत्र अहज्याह राजा झाला. इस्राएलाचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा पुत्र अहज्याह यहूदीयाचा राजा म्हणून राज्य करू लागला. वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, ती इस्राएलाचा राजा ओमरीची नात होती. तो अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, कारण त्याचे अहाबाच्या घराण्याशी विवाहाद्वारे संबंध होते. अरामचा राजा, हजाएलविरुद्ध रामोथ गिलआद येथे झालेल्या युद्धात अहज्याह इस्राएलचा राजा अहाबाचा पुत्र योरामच्या बाजूने लढला. या युद्धात योराम राजा जखमी झाला; रामाह येथे अरामचा राजा हजाएलशी लढताना झालेल्या जखमांना मलम पट्टी करण्यासाठी योराम राजा येज्रीलला परतला. यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याह हा अहाबाचा पुत्र योरामची प्रकृती पाहण्यासाठी येज्रीलला गेला, कारण योराम जखमी झाला होता.