YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ राजे 4:27-29

२ राजे 4:27-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि तिने डोंगरावर देवाच्या मनुष्याजवळ जाऊन त्याचे पाय धरले. तेव्हा तिला ढकलण्यास गेहजी जवळ आला, पण परमेश्वराच्या मनुष्याने म्हटले, “तिला एकटे सोड, ती काळजीत आहे. परमेश्वराने हिची समस्या माझ्यापासून लपवली आहे, मला काहिच कळवले नाही.” तेव्हा ती म्हणाली, “माझ्या स्वामी, मी तुझ्याजवळ मुलगा मागितला होता काय? ‘मला फसवू नको’ असे मी म्हटले नव्हते काय?” तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “निघायची तयारी कर व तुझ्या हातात माझी काठी घे, आणि तिच्या घरी जा. जर तुला कोणी भेटला तर त्यास सलाम करू नको, आणि कोणी तुला सलाम केला तर त्यास उत्तर देऊ नको. आणि माझी काठी त्या मुलाच्या तोंडावर ठेव.”

सामायिक करा
२ राजे 4 वाचा

२ राजे 4:27-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

डोंगर चढून देवाच्या माणसाजवळ आल्यावर तिने त्याचे पाय धरले. गेहजी तिला एकीकडे लोटायला जवळ गेला तेव्हा देवाचा माणूस त्याला म्हणाला, “तिला हात लावू नकोस, तिचे मन व्याकुळ झाले आहे; परमेश्वराने ही गोष्ट माझ्यापासून लपवली आहे, मला कळवली नाही.” ती म्हणाली, “मी स्वामींकडे पुत्राचा वर मागितला होता काय? मला फसवू नका असेच मी म्हटले होते ना?” तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “कंबर बांध आणि माझी काठी हाती घेऊन नीघ; वाटेने कोणी भेटल्यास सलाम करू नकोस; कोणी सलाम केल्यास त्याला उलट सलाम करू नकोस. माझी काठी नेऊन त्या मुलाच्या तोंडास लाव.”

सामायिक करा
२ राजे 4 वाचा