२ राजे 4:25-26
२ राजे 4:25-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग ती निघून कर्मेल डोंगरास परमेश्वराच्या मनुष्याकडे आली. अलीशाने तिला दुरुनच येताना पाहिले, तेव्हा त्याने गेहजी या आपल्या नोकराला म्हटले, “बघ, ती शूनेमची स्त्री येत आहे. कृपाकरून तिला भेटायला धावत जा आणि तिला विचार, तू व तुझा पती, तुझा मुलगा, हे सर्व ठीक आहेत ना?” ती म्हणाली, सर्वकाही ठीक आहे.
सामायिक करा
२ राजे 4 वाचा२ राजे 4:25-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग ती चालत कर्मेल पर्वतावर देवाच्या माणसाजवळ जाऊन पोहचली. तिला दुरून पाहून देवाचा माणूस आपला सेवक गेहजी ह्याला म्हणाला, “ती पाहा, शूनेमकरीण; धाव, तिला सामोरा जा आणि तिला विचार, तू खुशाल आहेस ना? तुझा नवरा खुशाल आहे ना? मूल खुशाल आहे ना?” तिने म्हटले, “सर्व खुशाल आहेत.”
सामायिक करा
२ राजे 4 वाचा