२ राजे 25:8-21
२ राजे 25:8-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी पाचव्या महिन्याच्या सप्तमीस नबुजरदान यरुशलेमेला आला; हा बाबेलच्या राजाचा सेवक असून गारद्यांचा नायक होता. त्याने परमेश्वराचे मंदिर व राजवाडा जाळून टाकला, तशीच यरुशलेमेतली सगळी मोठमोठी घरे जाळून टाकली. गारद्यांच्या सरदारांबरोबर असलेल्या खास्द्यांच्या सर्व सैन्याने यरुशलेमेभोवतालचे सर्व तट पाडून टाकले. शहरात राहिलेले अवशिष्ट लोक, बाबेलच्या राजाकडे फितून गेलेले लोक आणि उरलेले साधारण लोक ह्यांना गारद्यांचा नायक नबुजरदान ह्याने कैद करून नेले. देशातले जे लोक अतिशय कंगाल होते त्यांना गारद्यांच्या सरदाराने द्राक्षांच्या मळ्यांची व शेतांची मशागत करण्यास मागे ठेवले. परमेश्वराच्या मंदिरात असलेले पितळेचे खांब, मंदिरातला पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी ही खास्दी लोकांनी फोडूनतोडून त्यांचे पितळ बाबेलास नेले. पात्रे, फावडी, चिमटे, धूपदाने आणि सेवेची सर्व पितळेची उपकरणे त्यांनी नेली. अग्निपात्रे, कटोरे वगैरे जेवढी सोन्याची होती त्यांचे सोने व जी चांदीची होती त्यांची चांदी गारद्यांच्या सरदाराने नेली. दोन खांब, गंगाळसागर व त्याच्या बैठकी हे सर्व शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी केले होते, ह्या सर्व उपकरणांचे पितळ अपरिमित होते. एका खांबाची उंची अठरा हात असून त्यावर पितळेचा कळस होता; त्या कळसाची उंची तीन हात होती; त्या कळसाच्या सभोवार पितळेची जाळी व डाळिंबे केली होती; दुसर्या खांबालाही असेच जाळीचे काम होते. गारद्यांच्या सरदाराने मुख्य याजक सराया, दुय्यम याजक सफन्या व तीन द्वारपाळ ह्यांना पकडून नेले. योद्ध्यांवर नेमलेल्या एका खोजाला त्याने नगरातून पकडून नेले; राजाच्या हुजुरास असणारे पाच पुरुष त्याला शहरात आढळले त्यांनाही त्याने नेले; त्याप्रमाणेच लोकांची सैन्यात भरती करणारा सेनापतीचा चिटणीस आणि नगरात सापडलेल्या लोकांपैकी साठ माणसे ह्यांना त्याने नेले. गारद्यांचा सरदार नबुजरदान ह्याने त्यांना पकडून रिब्ला येथे बाबेलच्या राजाकडे नेले. बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.
२ राजे 25:8-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्यात सातव्या दिवशी नबूजरदान यरूशलेमेवर चाल करून आला. नबुजरदान हा राजाच्या उत्तम, निवडक सैन्याचा नायक होता. या नबुजरदानने परमेश्वराचे मंदिर, राजवाडा आणि यरूशलेममधील सर्व घरे जाळून टाकली. मोठमोठे वाडेही त्याने उद्ध्वस्त केले. मग खास्दी सैन्याने यरूशलेमची तटबंदी पाडली. नगरात अजून असलेले लोक बाबेलाच्या राज्याकडे फितून गेलेले लोक व उरलेले लोक यांना गारद्यांचा नायक नबूजरदानाने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले. अगदीच दरिद्री लोकांस तेवढे त्याने तेथेच राहू दिले. द्राक्षमळे आणि शेतीची देखभाल करण्यासाठी त्याने त्यांना तिथे ठेवले. परमेश्वराच्या मंदिरातील सर्व पितळी पात्रांची खास्दी सैन्याने मोडतोड केली. पितळी खांब, ढकलगाड्या, मोठमोठी पितळी घंगाळी यांची मोडतोड करून ते पितळ त्यांनी बाबेलला नेले. इतर पात्रे, फावडी, वाती कापण्याच्या कात्र्या, पळ्या, पितळी थाळ्या ही परमेश्वराच्या मंदिरातली सर्व उपकरणेही त्यांनी घेतली. अग्नीपात्रे, वाडगे, सोने-चांदीच्या लोभापायी सोन्यारुप्याची भांडीही नबुजरदानने हस्तगत केली. अशाप्रकारे, नबुजरदानने बळकावलेल्या वस्तू दोन पितळी स्तंभ. एक मोठे पितळी घंगाळ परमेश्वराच्या मंदिरासाठी शलमोनने करवून घेतलेल्या ढकलगाड्या, यांत इतके पितळ होते की त्याचे वजन करणे शक्य नव्हते. प्रत्येक स्तंभाची उंची सत्तावीस फूट त्यावरील कळस साडेचार फूट उंचीचे तेही पितळी असून त्यावर जाळीकाम आणि डाळिंबाची नक्षी होती, दोन्ही स्तंभ अगदी सारखेच होते. नबुजरदानने लोकांस मंदिरातून खाली नेले व मुख्य याजक सराया दुय्यम याजक सफन्या आणि तीन द्वारपाल आणि शहरातून एक सैन्याधिकारी अजूनही नगरात असलेले राजाचे पांच सल्लागार सैन्याधिकाऱ्याचा सचिव. हा जनगणना प्रमुख असून सैनिकांची निवड करत असे. शहरात सापडलेली साठ माणसेही त्याने घेतली. बाबेलातील रिब्ला येथे नबूजरदानाने या सर्वांना राजासमोर हजर केले. बाबेलाच्या राजाने त्या सर्वांची हमाथ देशातील रिब्ला येथे हत्या केली. अशाप्रकारे यहूदी यांना आपल्या भूमीतून बंदीवान म्हणून जावे लागले.
२ राजे 25:8-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी बाबेलच्या राजाच्या रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला. त्याने याहवेहचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमातील सर्व घरे अग्नीने जाळून टाकली. प्रत्येक महत्त्वाची इमारत जाळून भस्म केली. रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटबंदी पाडून टाकली. नंतर रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने शहराच्या विध्वंसातून वाचलेल्या आणि बाबेलच्या राजाला शरण गेलेल्या लोकांना बंदिवासात नेले. परंतु अधिकार्याने देशातील काही अत्यंत गरीब लोकांना द्राक्षमळ्याची व शेताची मशागत करण्यास मागे ठेवले. बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि ते कास्य बाबेलास घेऊन गेले. त्यांनी भांडी, फावडे, चिमटे आणि मंदिरात उपासनेसाठी वापरण्यात येणारी कास्याची सर्व भांडी सोबत नेली. रक्षक दलाच्या अधिकार्याने अग्निपात्रे आणि शिंपडण्याची भांडी—जे सर्व शुद्ध सोन्याचे किंवा चांदीचे होते, काढून घेतली. याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते. प्रत्येक खांब अठरा हात उंच होता. एका खांबावर कास्याचा कळस होता जो तीन हात उंच असून त्यावर सभोवती कास्याच्या डाळिंबाचे नक्षीकाम होते. नक्षीसह दुसरा खांबही तसाच होता. रक्षक दलाच्या अधिकार्याने प्रमुख याजक सेरायाह, दुसरा याजक सफन्याह आणि तीन द्वारपालांना बंदिवान म्हणून नेले. जे अजूनही शहरात होते त्यांच्याकडून त्याने योद्ध्यांचा एक अधिकारी आणि पाच राजकीय सल्लागार घेतले. लोकांची सैन्यात भरती करण्यासाठी मुख्य अधिकारी असलेल्या सचिवाला आणि शहरात सापडलेल्या साठ माणसांनाही त्याने नेले. रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदानने सर्वांना घेतले आणि रिब्लाह येथे बाबेलच्या राजाकडे आणले. हमाथ देशातील रिब्लाह येथे बाबेलच्या राजाने त्यांचा वध केला. याप्रकारे यहूदीयाचे लोक आपल्या देशापासून दूर बंदिवासात गेले.