२ राजे 17:1-4
२ राजे 17:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यहूदाचा राजा आहाज ह्याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी होशे बिन एला हा शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने नऊ वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले, तरी ते त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्राएलाच्या राजांएवढे नव्हते. अश्शूरचा राजा शल्मनेसर हा त्याच्यावर चढाई करून आला; होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्याला खंडणी दिली. अश्शूराच्या राजाला होशेची फितुरी दिसून आली; त्याने मिसर देशाचा राजा सो ह्याच्याकडे जासूद पाठवले आणि दरवर्षी जी खंडणी तो अश्शूराच्या राजाला देत असे ती देण्याचे त्याने बंद केले, म्हणून अश्शूराच्या राजाने त्याला पकडून बेड्या घालून कारागृहात ठेवले.
२ राजे 17:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यहूदाचा राजा आहाज याच्या बाराव्या वर्षी एलाचा मुलगा होशे शोमरोनांत इस्राएलवर राज्य करु लागला. त्याने नऊ वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट तेच तो करत असे, पण त्याच्या पूर्वीच्या इस्राएलांच्या राजांइतकी होशेची कारकीर्द वाईट नव्हती. अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करून आला. तेव्हा होशे त्याचा दास बनला आणि त्याने त्यास खंडणी भरून दिली. पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्यावर्षी होशेने खंडणीही दिली नव्हती. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्यास अटक करून कैदेत टाकले.
२ राजे 17:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यहूदीयाचा राजा आहाजच्या राजवटीच्या बाराव्या वर्षी एलाहचा पुत्र होशे शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने नऊ वर्षे राज्य केले. त्याने याहवेहच्या दृष्टीत वाईट ते केले, परंतु त्याच्यापूर्वी जे इस्राएलचे राजा होऊन गेले त्यांच्याइतके केले नाही. अश्शूरचा राजा शल्मनेसरने होशेवर हल्ला करून, त्याला जहागीरदार केले आणि त्याला कर द्यावा लागला. परंतु अश्शूरच्या राजाला होशे फितूर झाल्याचे कळले, कारण त्याने इजिप्त देशाचा राजा सो याच्याकडे दूत पाठविले होते, आणि राजाला निरोप दिला आणि त्याने अश्शूरच्या राजाला दरवर्षीप्रमाणे कर देण्याचे नाकारले. म्हणून अश्शूरचा राजा शल्मनेसरने त्याला कैद केले आणि त्याला तुरुंगात डांबले.