२ राजे 15:30-31
२ राजे 15:30-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
उज्जीयाचा3 पुत्र योथाम ह्याच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी होशे बिन एला ह्याने पेकह बिन रमाल्या ह्याच्याशी फितुरी करून त्याला मार देऊन त्याचा वध केला आणि तो त्याच्या गादीवर बसला. पेकह ह्याची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन इस्राएलाच्या राजांच्या बखरीत केले आहे, ते पाहा.
२ राजे 15:30-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
उज्जीयाचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करीत असल्याच्या विसाव्या वर्षी, एला याचा मुलगा होशे याने रमाल्याचा मुलगा पेकह याच्याविरुध्द कट केला. होशेने पेकहला ठार केले. पेकह नंतर मग होशे राजा झाला. पेकहने जे पराक्रम केले त्याची नोंद इस्राएलच्या राजांचा इतिहास या पुस्तकात आहे.
२ राजे 15:30-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर एलाहचा पुत्र होशेने रमाल्याहचा पुत्र पेकहाच्या विरुद्ध कट रचला. त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला ठार केले व त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला. ही घटना उज्जीयाहचा पुत्र योथामाच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी घडली. पेकहच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले ते इस्राएली राजांच्या इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय?