YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 योहान 1:2-13

2 योहान 1:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

वडिलांकडून देवाने निवडलेली स्त्री कुरिया व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीती करतो आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे इतर सर्वजणसुद्धा प्रीती करतात. या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये सर्वकाळ राहील. देवपित्यापासून आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपणाबरोबर राहोत. पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले यावरुन मला फार आनंद झाला. आणि स्त्रिये, मी तुला आता, विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी तुला नवी आज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. आणि त्याच्या आज्ञेत चालणे म्हणजेच प्रीती करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे. आम्ही केलेले काम तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे, म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्यास देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्यास पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्यास घरात घेऊ नका किंवा त्यास सलामही करू नका. कारण जो कोणी त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो. मला जरी अनेक गोष्टी तुम्हास लिहायच्या आहेत तरी त्या तुम्हास मी शाई व लेखणीने लिहू इच्छित नाही. तर त्याऐवजी तुम्हास भेटावे व प्रत्यक्ष सर्वकाही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे. म्हणजे आपला आनंद त्यामुळे परिपूर्ण होईल. देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीची मुले तुम्हास सलाम सांगतात.

सामायिक करा
2 योहान 1 वाचा

2 योहान 1:2-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

कारण जे सत्य आमच्यामध्ये राहते आणि तेच आमच्याबरोबर कायम राहील. परमेश्वर जे पिता आणि येशू ख्रिस्त जे पित्याचा पुत्र यांच्याकडून सत्य आणि प्रीती यामध्ये कृपा, दया आणि शांती तुम्हाबरोबर राहील. पित्याने आपल्याला आज्ञा केल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. आता, हे प्रिय स्त्रिये, मी तुला नवी आज्ञा लिहित नाही परंतु तीच जी प्रारंभापासून देण्यात आली आहे. मी तुम्हास सांगतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. प्रीती हीच आहे की, आपण त्यांच्या आज्ञेचे पालन करीत जीवन जगतो. जसे तुम्ही सुरुवातीपासूनच ऐकले आहे, त्यांची आज्ञा आहे की तुम्ही प्रीतिपूर्ण जीवन जगावे. मी तुम्हाला सांगतो की, फसवणूक करणारे असे पुष्कळजण जगामध्ये निघालेले आहेत, येशू ख्रिस्त देह धारण करून या जगात आले, याचा ते अंगीकार करीत नाहीत. अशा प्रकारची कोणीही व्यक्ती फसवणूक करणारी आणि ख्रिस्तविरोधक आहे. आम्ही जे परिश्रम केले आहेत ते तुम्ही हरवू नये यासाठी जपा, परंतु तुम्हाला त्याचा संपूर्ण मोबदला मिळावा. जे कोणी सर्वांच्या पुढे जात राहतात आणि ख्रिस्ताच्या शिक्षणात राहत नाहीत त्यांच्याकडे परमेश्वर नाही; जो कोणी या शिक्षणात राहतो त्यांच्याकडे पिता आणि पुत्र दोघेही आहेत. जर कोणी तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला असे शिक्षण देत नाही, तर त्यांना तुमच्या घरात घेऊ नका किंवा त्यांचे स्वागतही करू नका. तुम्ही जर त्यांचे स्वागत केले, तर तुम्ही त्यांच्या दुष्कर्मामध्ये भागीदार व्हाल. तुम्हाला लिहिण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ काही आहे, परंतु ते कागद आणि शाईने लिहून कळवावे अशी माझी इच्छा नाही. त्याऐवजी तुमची भेट घ्यावी आणि समोरासमोर तुमच्याबरोबर बोलावे अशी आशा करतो म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल. जिला परमेश्वराने निवडले आहे, त्या तुझ्या बहिणीची मुले त्यांच्या शुभेच्छा पाठवितात.

सामायिक करा
2 योहान 1 वाचा

2 योहान 1:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

निवडलेली बाई1 व तिची मुले ह्यांना, वडील2 ह्यांच्याकडून : जे सत्य आपल्या ठायी आहे व आपल्याबरोबर सर्वकाळ राहील, त्या सत्यामुळे तुमच्यावर मी खरी प्रीती करतो; आणि मीच केवळ नव्हे तर ज्यांना सत्याचे ज्ञान झाले आहे ते सर्वच करतात. देवपित्यापासून व पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपल्याबरोबर राहतील. आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्यामुळे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला. बाई, आता मी तुला विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी; ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. प्रीती हीच आहे की, आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की, जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे. आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही; जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका; कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. मला तुम्हांला पुष्कळ लिहायचे होते, ते कागद व शाई ह्यांनी लिहावेसे वाटत नाही; तर तुमच्याकडे येऊन मला समक्ष बोलता येईल अशी मी आशा बाळगतो; म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल. तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला सलाम सांगतात.

सामायिक करा
2 योहान 1 वाचा

2 योहान 1:2-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

कारण सत्य आपल्यामध्ये आहे व आपल्याबरोबर सर्वकाळ राहील. देवपित्याकडून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याकडून सत्यात व प्रीतीत आपल्याला कृपा, दया व शांती मिळो. आपल्याला पित्याकडून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला. बाई, आता मी तुला विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे, तीच लिहितो. प्रीती हीच आहे की, आपण त्याच्या आज्ञेप्रमाणे चालावे. ती आज्ञा ही आहे की, जसे तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे, तसे तुम्ही प्रीतीने चालावे. फसवणूक करणारी, म्हणजेच येशू ख्रिस्त मानव म्हणून आला हे मान्य न करणारी, पुष्कळ माणसे जगात वावरत आहेत. असा मनुष्य फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधी आहे. आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण पारितोषिक तुम्हांला मिळावे म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो ह्या शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ती झाली आहे. म्हणून हे शिक्षण न देणारा कोणी तुमच्याकडे आला, तर त्याचे स्वागत करू नका; त्याचे क्षेमकुशलदेखील विचारू नका. कारण जो त्याचे स्वागत करतो, तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. मी तुम्हांला पुष्कळ लिहिणार होतो परंतु ते कागद व शाई ह्यानी लिहावेसे वाटत नाही, तर तुमच्याकडे येऊन मला समक्ष बोलता येईल, अशी मी आशा बाळगतो, म्हणजे आपला आनंद परिपूर्ण होईल. तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले तुला शुभेच्छा पाठवीत आहेत.

सामायिक करा
2 योहान 1 वाचा