२ करिंथ 8:8-9
२ करिंथ 8:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
२ करिंथ 8:8-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याबाबतीत मी तुम्हाला आज्ञा करीत नाही; तर इतरांच्या उत्सुकतेशी तुमच्या प्रीतीच्या खरेपणाची परीक्षा करावयाची आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, जरी ते इतके धनवान होते तरी तुमच्यासाठी दरिद्री झाले, यासाठी की त्यांच्या दारिद्रयाने तुम्ही धनवान व्हावे.
२ करिंथ 8:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसर्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
२ करिंथ 8:8-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी तुमच्याकरिता आदेश देत नाही, तर दुसऱ्यांच्या कळकळीच्या तुलनेत तुमच्या प्रीतीचा खरेपणा तपासून पाहण्यासाठी मी हे सांगत आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरिता गरीब झाला, अशा हेतूने की, त्याच्या गरिबीने तुम्ही धनवान व्हावे.