२ करिंथ 8:3-5
२ करिंथ 8:3-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे आपण होऊन दिले. पवित्रजनांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याची कृपा मिळावी म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हास विनंती केली. आम्हास आशा होती त्याप्रमानेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हासही दिले.
२ करिंथ 8:3-5 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यांनी आपल्याला जे शक्य होते तेवढेच दिले असे नाही, तर आपल्या शक्तिपलीकडे दिले; आणि स्वतःहून दिले अशी मी साक्ष देतो. प्रभुच्या लोकांना साहाय्य करण्याच्या सेवेत त्यांना अनुमती दिली जावी आणि त्यांना सहभागी होता यावे म्हणून त्यांनी आम्हाला फार विनवणी केली. आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी अधिक दिले, त्यांनी प्रथम स्वतः प्रभुला आणि परमेश्वराच्या इच्छेने आम्हालाही दिले.
२ करिंथ 8:3-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी; आम्हांला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणांस आम्हांलाही दिले.
२ करिंथ 8:3-5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्यांनी आपल्या ऐपतीनुसार व ऐपतीपलीकडेही आपण होऊन दान दिले, हे मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगू इच्छितो. त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक विनंती केली की, यहुदियातील पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. आम्हांला आशा होती त्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांनी प्रथम स्वतःचे समर्पण प्रभूला केले आणि देवाच्या इच्छेनुसार स्वतःस आमच्यासाठीदेखील वाहून घेतले.