२ करिंथ 5:19-20
२ करिंथ 5:19-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणजे लोकांचे अपराध त्यांच्या हिशोबी न धरता, देव जगाचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करीत होता आणि समेटाचे वचन त्याने आमच्यावर सोपवले. तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हास आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा.
२ करिंथ 5:19-20 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर ख्रिस्ताद्वारे जगाशी समेट घडवून आणत होते आणि लोकांची पातके त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हते. हाच समेटाचा संदेश त्यांनी आम्हाकडे सोपवून दिला आहे. आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काही परमेश्वर आमच्याद्वारे तुम्हाला विनंती करीत आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हाला विनवतो की, परमेश्वराबरोबर तुमचा समेट होऊ द्या.
२ करिंथ 5:19-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वत:बरोबर जगाचा समेट करत होता; आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.
२ करिंथ 5:19-20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
म्हणजे जगातील लोकांची पापे त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेट घडवून आणण्याचा संदेश सोपवून दिला आहे. ज्याअर्थी परमेश्वर आमच्याद्वारे आवाहन करीत आहे, त्याअर्थी आम्ही राजदूत आहोत म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही परमेश्वराबरोबर समेट केलेले व्हा.