YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 5:18-21

२ करिंथ 5:18-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली; म्हणजे लोकांचे अपराध त्यांच्या हिशोबी न धरता, देव जगाचा ख्रिस्ताद्वारे स्वतःशी समेट करीत होता आणि समेटाचे वचन त्याने आमच्यावर सोपवले. तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हास आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा. कारण जो पाप जाणत नव्हता त्यास त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.

सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा

२ करिंथ 5:18-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे सर्व परमेश्वरापासून आहे, ज्यांनी आमचा त्यांच्याशी ख्रिस्ताद्वारे समेट केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली आहे. परमेश्वर ख्रिस्ताद्वारे जगाशी समेट घडवून आणत होते आणि लोकांची पातके त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हते. हाच समेटाचा संदेश त्यांनी आम्हाकडे सोपवून दिला आहे. आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत, जणू काही परमेश्वर आमच्याद्वारे तुम्हाला विनंती करीत आहे. आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हाला विनवतो की, परमेश्वराबरोबर तुमचा समेट होऊ द्या. ज्यांच्या ठायी पाप नव्हते, त्यांना आपल्यासाठी पापार्पण असे केले, म्हणजे त्यांच्याशी आपण संयुक्त होऊन, परमेश्वराचे नीतिमत्व व्हावे.

सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा

२ करिंथ 5:18-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ही सगळी देवाची करणी आहे; त्याने स्वत:बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हांला दिली; म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वत:बरोबर जगाचा समेट करत होता; आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले. म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.

सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा

२ करिंथ 5:18-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

हे देवाचे कार्य आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताद्वारे केला आणि समेट घडवून आणण्याचे सेवाकार्य आमच्यावर सोपविले. म्हणजे जगातील लोकांची पापे त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता आणि त्याने आपल्याकडे समेट घडवून आणण्याचा संदेश सोपवून दिला आहे. ज्याअर्थी परमेश्वर आमच्याद्वारे आवाहन करीत आहे, त्याअर्थी आम्ही राजदूत आहोत म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या वतीने तुम्हांला विनंती करतो की, तुम्ही परमेश्वराबरोबर समेट केलेले व्हा. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरिता पाप असे केले कारण त्याच्यामुळे आपले देवाबरोबरचे संबंध यथोचित व्हावेत.

सामायिक करा
२ करिंथ 5 वाचा

२ करिंथ 5:18-21

२ करिंथ 5:18-21 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा