२ करिंथ 4:8-12
२ करिंथ 4:8-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आमच्यावर चोहोंकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही; आम्ही प्रभू येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो, अशा हेतूने की, येशूचे जीवनही आमच्या शरीरांत प्रकट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशूप्रीत्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपवलेले आहोत, ह्यासाठी की, येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे. आमच्यामध्ये मरण, पण तुमच्यामध्ये जीवन आपले कार्य चालवते.
२ करिंथ 4:8-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, आम्ही गोधळलेलो आहोत पण निराश झालो नाही. आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही निरंतर आमच्या शरीरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरीरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. कारण आम्ही जे जिवंत आहोत ते येशूकरता मरणाच्या सतत स्वाधीन केले जात आहोत; म्हणजे आमच्या मरणाधीन देहात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. म्हणून, आमच्यात मरण, पण तुमच्यात जीवन हे कार्य करते.
२ करिंथ 4:8-12 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही चोहोकडून अतिशय दबून गेलो आहोत, परंतु चिरडले गेलो नाही; घोटाळ्यात पडलो, परंतु हताश होत नाही. छळ झाला पण त्याग करण्यात आला नाही; आम्हाला खाली पाडण्यात आले, परंतु नाश झाला नाही. आम्ही नेहमीच येशूंच्या मरणाला आमच्या शरीरात घेऊन वावरतो यासाठी की येशूंचे जीवनसुद्धा आमच्या शरीरांमध्ये प्रकट व्हावे. म्हणून आम्ही, जे जिवंत आहोत ते येशूंप्रीत्यर्थ मरणासाठी सोपवून दिले गेलेले आहोत, यासाठी की आमच्या मर्त्य देहांमध्ये सुद्धा त्यांचे जीवन प्रकट व्हावे. आमच्यामध्ये मृत्यू कार्य करतो, परंतु तुम्हामध्ये जीवन कार्य करते.
२ करिंथ 4:8-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आमच्यावर सर्व बाजूंनी संकटे आली, तरी आम्ही चिरडले गेलो नाही. आम्ही गोंधळलो, तरी निराश झालो नाही. आमचा छळ झाला, तरी आम्हांला टाकून देण्यात आले नाही. आमच्यावर प्रहार झाले, तरी आमचा विध्वंस झाला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा लक्षात ठेवतो ज्यामुळे येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट होते. येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे ह्यासाठी आमचे आयुष्य आम्ही येशूसाठी सदाचे मरणाच्या हाती सोपवलेले आहे. याचा अर्थ असा की, आमच्यामध्ये मरण, पण तुमच्यामध्ये जीवन कार्य करीत आहे.