२ करिंथ 4:3-7
२ करिंथ 4:3-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण आमची सुवार्ता आच्छादली गेली असेल तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी ती आच्छादली गेली आहे. जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने या युगाच्या दुष्ट दैवताने आंधळी केलीली आहेत. कारण आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही पण ख्रिस्त येशू जो प्रभू आहे त्याची आम्ही घोषणा करतो आणि येशूकरता आम्ही तुमचे दास आहोत. कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे. पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे.
२ करिंथ 4:3-7 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जरी आमची शुभवार्ता आच्छादिलेली असली, तर ती ज्यांचा नाश होणार आहे, त्यांच्यापासूनच आच्छादिलेली आहे. या जगाच्या अधिपतीने विश्वासणार्यांची मने आंधळी केली आहेत, म्हणून शुभवार्तेचा प्रकाश जो ख्रिस्ताचे गौरव आणि परमेश्वराची प्रतिमा प्रकट करतो, ते पाहू शकत नाहीत. आम्ही स्वतःविषयी प्रचार करीत नाही, तर ख्रिस्त येशू हेच प्रभू आणि आम्ही येशूंसाठी तुमचे दास आहोत. कारण, “अंधकारातून प्रकाश हो,” असे जे परमेश्वर बोलले, त्यांनी येशू ख्रिस्ताच्या मुखावरील ज्ञानाच्या तेजाचा प्रकाश आमच्या अंतःकरणांत दिला आहे. तरी आम्हासाठी हा मोलवान ठेवा एका मातीच्या पात्रात ठेवलेला आहे हे दाखविण्यासाठी की, जे अपार सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून परमेश्वराकडून आहे, हे प्रत्येकाला दिसावे.
२ करिंथ 4:3-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणार्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. कारण आम्ही आपली घोषणा करत नाही; तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशूप्रीत्यर्थ आम्ही तुमचे दास आहोत अशी स्वतःची घोषणा करतो. कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे.
२ करिंथ 4:3-7 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण आमचे शुभवर्तमान आच्छादिलेले असल्यास ज्यांचा नाश होत आहे, त्यांच्यासाठी ते आच्छादिलेले आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची तंतोतंत प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या वैभवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये. कारण आम्ही स्वतःची घोषणा करत नाही. तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशूसाठी आम्ही तुमचे सेवक आहोत, अशी घोषणा आम्ही करतो. अंधारातून उजेड प्रकाशित होईल, असे देव म्हणाला त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या वैभवशाली ज्ञानाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात पाडला आहे. तरीही आमचा आध्यात्मिक खजिना मातीच्या भांड्यात आहे, सामर्थ्याचा कळस देवामध्ये आहे, आमच्याकडे नाही, हे दाखविले जावे.