२ करिंथ 3:7-11
२ करिंथ 3:7-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण दगडावर कोरलेल्या अक्षरात लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की, इस्राएल लोक मोशेच्या तोंडावरील तेज, जे नाहीसे होत चालले होते, त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववत नव्हती. तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती तिच्यापेक्षा किती विशेषकरून अधिक तेजोमय असणार. इतकेच नव्हे, तर “जे तेजस्वी होते ते” या तुलनेने हीनदीन ठरले. कारण जे नाहीसे होणार होते ते जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार.
२ करिंथ 3:7-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता जे अक्षर दगडावर कोरलेले असून ज्याचा परिणाम मरण ती सेवा एवढी गौरवी होती, की जरी कमी होणार्या तेजामुळे इस्राएल लोकांना मोशेच्या चेहर्याकडे स्थिर पाहत राहणे अशक्य झाले होते, पण हळूहळू ते तेज कमी होत गेले. पवित्र आत्म्याची सेवा त्याहूनही खूपच अधिक वैभवशाली नव्हे काय? दंड करणारी सेवा जर एवढी तेजस्वी होती, तर नीतिमत्वाची सेवा त्याहून कितीतरी अधिक तेजस्वी असेल! खरे म्हणजे जे तेजस्वी होते ते तेज नसून त्याची तुलना करता, पहिल्या तेजाचे मोल काहीच नाही. आणि जर लोप पावत चाललेले तेजोमय होते, तर जे अनंतकालिक आहे त्याचे तेज निश्चितच अधिक आहे.
२ करिंथ 3:7-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जिचा लेख दगडांवर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूत होत असे ती सेवा एवढी तेजस्वी होती की ‘मोशेच्या चेहर्याचे तेज’ नाहीसे होत चालले असूनही इस्राएल लोकांना जर त्याच्या चेहर्याकडे टक लावून पाहवेना, तर आध्यात्मिक सेवा विशेषेकरून तेजस्वी होणार नाही काय? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती विशेषेकरून अधिक तेजोमय असणार. इतकेच नव्हे, तर ‘जे तेजस्वी होते ते’ ह्या तुलनेत अपरंपार तेजापुढे तुलनेने ‘तेजोहीन ठरले’. नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार.
२ करिंथ 3:7-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ज्याचा लेख दगडांवर कोरलेला असून ज्याचा शेवट मृत्यूत होत असे, ते सेवाकार्य एवढे तेजस्वी होते की, मोशेच्या मुखावरचे तेज नाहीसे होत चालले असतानाही इस्राएली लोकांना जर त्याच्या मुखाकडे टक लावून पाहवेना, तर आध्यात्मिक सेवाकार्य अधिक प्रमाणात तेजस्वी असणार नाही काय? ज्या व्यवस्थेचा परिणाम दंडाज्ञा, ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती किती अधिक तेजोमय असणार! इतकेच नव्हे, तर जे तेजस्वी होते ते ह्या अपरंपार तेजापुढे निस्तेज ठरले. अल्पावधीसाठी असलेले जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत आहे, ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार नाही का?