YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 3:12-18

२ करिंथ 3:12-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तर मग आम्हास अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो. आम्ही मोशेप्रमाणे करीत नाही; त्याने तोंडावर आच्छादन घातले ते ह्यासाठी की, जे नाहीसे होत चालले होते ते इस्राएल लोकांस शेवटपर्यंत बघता येऊ नये. पण त्यांची मने कठीण केली गेली कारण आजवर ते आच्छादन, तसेच जुन्या कराराच्या वाचनात, न काढलेले राहिले आहे; ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे. पण आजपर्यंत ते आच्छादन, ते मोशेचे ग्रंथ वाचन करीत असता, त्यांच्या मनावर घातलेले असते. पण ते जेव्हा प्रभूकडे वळेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल. आणि प्रभू आत्मा आहे व जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्वजण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.

सामायिक करा
२ करिंथ 3 वाचा

२ करिंथ 3:12-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आम्हाला अशी आशा आहे म्हणून आम्हाला मोठे धैर्यही आहे. आम्ही मोशेसारखे नाही, ज्याने लोप पावत चाललेले वैभव इस्राएली लोकांनी पाहू नये म्हणून आपल्या मुखावर आच्छादन घातले. परंतु त्यांची मने आता मंद झाली व जुना करार वाचला जात असताना आजही तेच आच्छादन आहे. ते फक्त ख्रिस्तामध्येच दूर केले जाईल. आज या दिवसापर्यंत जेव्हा मोशेचा ग्रंथ वाचला जातो, तेव्हा त्यांच्या हृदयावर आच्छादन राहते. परंतु जेव्हा कोणी प्रभूकडे वळतो, त्यावेळी हे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा तिथे स्वातंत्र्य आहे. आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्‍या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत.

सामायिक करा
२ करिंथ 3 वाचा

२ करिंथ 3:12-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तर मग आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो; इस्राएल लोकांनी जे नाहीसे होत चालले होते त्या तेजाकडे एकसारखी दृष्टी लावू नये ‘म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालत असे,’ तसे आम्ही करत नाही. परंतु त्यांची मने कठीण झाली; कारण जुना करार वाचून दाखवण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढलेले राहते; ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. आजपर्यंत मोशेचा ग्रंथ वाचून दाखवण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंत:करणावर आच्छादन राहते; परंतु त्यांचे अंत:करण प्रभूकडे वळले म्हणजे ‘आच्छादन काढले जाते.’ प्रभू आत्मा आहे;1 आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.

सामायिक करा
२ करिंथ 3 वाचा

२ करिंथ 3:12-18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आम्हांला अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो. इस्राएली लोकांनी जे निष्प्रभ होत होत नाहीसे होत चालले होते, ते तेज पाहू नये म्हणून मोशेने आपल्या मुखावर आच्छादन घातले होते, तसे आम्ही करत नाही. परंतु त्यांची मने खरोखर कठोर झाली आणि आजतागायत जुना करार वाचून दाखविण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन तसेच न काढलेले आढळते. जेव्हा मनुष्य ख्रिस्ताशी जोडला जातो तेव्हा हे आच्छादन दूर केले जाते. आजदेखील जुना करार वाचून दाखविण्यात येतो, तेव्हा त्यांच्या मनावर आच्छादन असते. परंतु पवित्र शास्त्रात मोशेविषयी म्हटल्याप्रमाणे ते दूर केले जाऊ शकते:’तो प्रभूकडे वळला, तेव्हा त्याचे आच्छादन दूर करण्यात आले.’ येथे प्रभू म्हणजे पवित्र आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे, तेथे स्वातंत्र्य आहे. मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण, आरशातून प्रतिबिंबित होते त्याप्रमाणे प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करतो आणि पवित्र आत्म्याकडून येत असलेले हे वैभव आपल्याला प्रभूबरोबर अधिकाधिक एकरूप करीत आहे.

सामायिक करा
२ करिंथ 3 वाचा