२ करिंथ 2:1-4
२ करिंथ 2:1-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मी स्वतःशी ठरवले होते की, मी पुन्हा दुःख देण्यास तुमच्याकडे येऊ नये. कारण जर मी तुम्हास दुःख देतो, तर ज्याला माझ्यामुळे दुःख होते त्याच्यावाचून मला आनंदित करणारा कोण आहे? आणि मी हेच लिहिले होते, म्हणजे मी आल्यावर ज्यांच्याविषयी मी आनंद करावा त्यांच्याकडून मला दुःख होऊ नये, मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे. कारण, मी दुःखाने, मनाच्या तळमळीने व अश्रू गाळीत तुम्हास लिहिले ते तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही पण तुमच्यावर जी माझी प्रीती आहे तिची खोली तुम्हास समजावी.
२ करिंथ 2:1-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी स्वतःशी निश्चय करून म्हणालो की तुम्हाला आणखी एक दुःखद भेट देणार नाही. कारण मी तुम्हाला दुःखी केले, तर मग ज्यांना मजकडून दुःख झाले आहे त्या तुमच्याशिवाय मला कोण आनंदित करेल? मी लिहिल्याप्रमाणे केले, मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद मिळावा, त्यांच्याकडून मला दुःख होणार नाही. मला तुम्हा सर्वांवर भरवसा होता की तुम्ही सर्वजण माझ्या आनंदात सहभागी व्हाल. तुम्हाला दुःखी करावे म्हणून नव्हे तर माझ्या प्रीतीची खोली तुम्हाला कळावी, म्हणून हे पत्र मी तुम्हाला क्लेश आणि हृदयाच्या यातना आणि अनेक आसवे गाळून लिहिले आहे.
२ करिंथ 2:1-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी आपल्या मनात निश्चय केला होता की, दु:ख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये. कारण जर मी तुम्हांला दु:ख देऊ लागलो तर माझ्यापासून ज्याला दु:ख होते त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे? तुम्हांला मी हेच लिहिले होते, ह्यासाठी की, मी आल्यावर, ज्यांच्यापासून मला आनंद व्हायचा त्यांच्यापासून मला दु:ख होऊ नये; मला तुम्हा सर्वांविषयी असा भरवसा आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा आनंद आहे. मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळत तुम्हांला लिहिले होते; तुम्ही दु:खी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हांला कळून यावी म्हणून लिहिले.
२ करिंथ 2:1-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी मनात निश्चय केला होता की, दुःख देण्यास तुमच्याकडे पुन्हा येऊ नये. जर मी तुम्हांला दुःख देऊ लागलो, तर मला आनंद कोण देणार? ज्यांना मी दुःखी केले होते तेच ना? म्हणूनच मी तुम्हांला पहिले पत्र लिहिले होते, ज्यामुळे मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद होईल, त्यांच्यापासून मला दुःख होऊ नये. मला तुम्हां सर्वांविषयी अशी खातरी आहे की, माझा आनंद तो तुमच्या सर्वांचा आनंद आहे. मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळीत तुम्हांला लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विपुल प्रीती आहे, ती तुम्हांला कळून यावी म्हणून लिहिले.