२ इतिहास 28:16-21
२ इतिहास 28:16-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या वेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजाकडे जासूद पाठवून कुमक मागितली. कारण अदोमी लोकांनी पुन्हा येऊन यहूदास मार देऊन काही लोक पाडाव करून नेले होते. आणि पलिष्टी लोक तळवट व यहूदाचा दक्षिण प्रांत ह्यांतील नगरांवर स्वारी करून बेथ-शेमेश, अयालोन, खदेरोथ, सोखो व त्याच्या आसपासची खेडीपाडी, तिम्ना व त्याच्या आसपासची खेडीपाडी आणि गिम्जो व त्याच्या आसपासची खेडीपाडी ही सर्व काबीज करून त्यांत राहू लागले. इस्राएलाचा राजा आहाज ह्याच्यामुळे परमेश्वराने यहूदाला नमवले. कारण यहूदात स्वैरपणे वागून त्याने परमेश्वराविरुद्ध उल्लंघन केले. ह्यामुळे अश्शूराचा राजा तिल्गथ-पिल्नेसर ह्याने त्याच्याकडे येऊन त्याला त्रस्त केले; त्याला साहाय्य केले नाही. आहाजाने परमेश्वराच्या मंदिरातून आणि राजाच्या व सरदारांच्या घरांतून धन घेऊन अश्शूरच्या राजाला दिले, तरी त्याचा त्याला काही उपयोग झाला नाही.
२ इतिहास 28:16-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
याचवेळी अदोमच्या लोकांनी यहूदावर चढाई करून त्यांचा पाडाव केला. अदोम्यांनी यहूदी लोकांस कैद करून नेले. तेव्हा राजा आहाजने अश्शूरच्या राजाकडे मदत मागितली. कारण अदोमी लोकांनी पुनः येऊन यहूदात मार देऊन काही लोक बंदी करून नेले होते. पलिष्ट्यांनीही डोंगराळ तळवटीच्या भागातल्या गावांवर आणि दक्षिण यहूदावर हल्ला केला. बेथ-शेमेश, अयालोन, गदेरोथ, सोखो, तिम्ना आणि गिम्जो ही गावे त्यांच्या आसपासच्या खेड्यांसह काबीज केली. व तेथे ते राहायला गेले. परमेश्वराने यहूदाला संकटानी जेरीला आणले कारण इस्राएलाचा राजा आहाज याने वाईट वर्तन केले होते. आहाजाने परमेश्वराविरूद्ध महापाप केले होते. तिल्गथ-पिल्नेसर हा अश्शूराचा राजा. याने आहाजला मदत करण्याऐवजी त्रासच दिला. आहाजने परमेश्वराच्या मंदिरातील, राजमहालातील तसेच सरदारांच्या घरातील धनदौलत घेऊन अश्शूरच्या राजाला दिली पण त्याचाही फायदा झाला नाही.
२ इतिहास 28:16-21 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्यावेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजांकडे मदतीसाठी बोलाविणे पाठविले होते. एदोमी लोक पुन्हा आले होते आणि त्यांनी यहूदीयावर हल्ला केला आणि कैद्यांना पळवून नेले. त्यावेळेस पलिष्ट्यांनी डोंगर पायथ्याशी असलेल्या नगरांवर आणि यहूदीयाच्या नेगेवमधील गावांवर हल्ला केला. त्यांनी बेथ-शेमेश, अय्यालोन आणि गदेरोथ, तसेच सोकोह, तिम्नाह आणि गिम्झो आणि त्यांच्या आजूबाजूची गावे काबीज केली. इस्राएलचा राजा आहाजमुळे याहवेहनी यहूदीयाला नम्र केले होते, कारण त्याने यहूदीयामध्ये दुष्टमार्गाला चालना दिली होती आणि तो याहवेहबरोबर अत्यंत अविश्वासू राहिला. अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर त्याच्याकडे आला, परंतु त्याने त्याला मदत करण्याऐवजी त्याला त्रास दिला. आहाज राजाने याहवेहच्या मंदिरातून आणि राजवाड्यातून आणि अधिकाऱ्यांकडून काही वस्तू घेतल्या आणि अश्शूरच्या राजाला भेट म्हणून दिल्या, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.