YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 21:8-20

२ इतिहास 21:8-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याच्या कारकिर्दीत अदोमाने यहूदाचे स्वामित्व झुगारून देऊन आपला राजा नेमला. तेव्हा यहोराम आपले सेनानायक व आपले सर्व रथ बरोबर घेऊन तिकडे गेला. ज्या अदोमी लोकांनी त्याला घेरले होते त्यांना व रथांच्या नायकांना त्याने रात्रीच्या वेळी उठून मार दिला. अदोमाने यहूदाचे स्वामीत्व झुगारून दिले; ते आजवर तसेच आहे. ह्याच सुमारास लिब्नाने त्याचे स्वामित्व झुगारून दिले; त्याने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याला सोडले होते म्हणून असे झाले. त्याने आणखी यहूदाच्या पहाडांवर उच्च स्थाने बांधली आणि यरुशलेमेतल्या रहिवाशांना व्यभिचारी मतीने चालायला लावून यहूदास बहकवले. एलीया संदेष्ट्याकडून त्याला एक लेख आला तो असा : “तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर म्हणतो, ‘तू आपला बाप यहोशाफाट ह्याच्याप्रमाणे व यहूदाचा राजा आसा ह्याच्याप्रमाणे चालला नाहीस; तर इस्राएलाच्या राजाप्रमाणे चाललास आणि अहाबाच्या घराण्याप्रमाणे यहूदी व यरुशलेमनिवासी ह्यांना व्यभिचारी मतीने चालायला लावले, त्याचप्रमाणे तुझ्याहून चांगले असे जे तुझ्या बापाच्या घराण्यातील तुझे भाऊबंद त्यांचा तू वध केलास; ह्यामुळे पाहा, तुझे लोक, तुझी मुलेबाळे, तुझ्या स्त्रिया व तुझे सर्व धन ह्यांवर परमेश्वर मोठा प्रहार करील; तू आतड्यांच्या रोगाने बहुत पीडा पावशील; तो रोग इतका वाढेल की त्यामुळे दिवसानुदिवस तुझी आतडी गळून पडतील.”’ परमेश्वराने पलिष्टी व कूशी लोकांच्या शेजारचे अरबी लोक ह्यांची मने क्षुब्ध करून त्यांना यहोरामावर उठवले; ते यहूदावर स्वारी करून त्यात घुसले आणि राजमंदिरात जितकी संपत्ती मिळाली तितकी सर्व आणि राजपुत्र व राजस्त्रिया ही अवघी त्यांनी नेली; त्याचा कनिष्ठ पुत्र यहोआहाज1 ह्याच्याखेरीज त्याच्याजवळ कोणी पुत्र राहिला नाही. ह्यानंतर परमेश्वराने त्याच्या आतड्यांना असाध्य रोगाची पीडा लावली. उत्तरोत्तर त्या रोगामुळे त्याची आतडी गळत गेली आणि तो अत्यंत पीडा भोगून दोन वर्षांच्या अंती मरण पावला. त्याच्या वाडवडिलांसाठी लोकांनी जशी धूपद्रव्ये जाळली होती तशी त्याच्यासाठी मुळीच जाळली नाहीत. तो राज्य करू लागला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता; त्याने आठ वर्षे यरुशलेमेत राज्य केले; तो सर्वांना अप्रिय होऊन मरण पावला; त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, पण ती राजांच्या थडग्यांत दिली नाही.

सामायिक करा
२ इतिहास 21 वाचा

२ इतिहास 21:8-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यहोरामाच्या कारकीर्दीत अदोमने यहूदाच्या सत्तेविरुध्द बंड पुकारले. अदोमच्या लोकांनी स्वत: आपला राजा निवडला. तेव्हा आपले सर्व सेनापती आणि रथ यांच्यासह यहोराम अदोमवर चाल करून गेला. अदोमी सैन्याने त्यांना वेढा घातला. पण यहोरामाने रात्रीची वेळ साधून त्यांच्यावर प्रतिहल्ला केला. तेव्हापासून आजतागायत अदोमची यहूदाशी बंडखोरी चालू आहे. लिब्ना नगरातील लोकांनीही यहोरामाची सत्ता झुगारली. यहोरामाने आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याचा त्याग केल्यामुळे असे झाले. यहोरामाने यहूदातील पहाडांवर प्रार्थनेसाठी उच्चस्थाने बांधली आणि यरूशलेमेतील लोकांना व्यभिचारी मतीने चालायला लावले. अशाप्रकारे यहोरामाने यहूदी लोकांस परमेश्वरापासून दूर नेले. एलीया या संदेष्ट्याकडून यहोरामाला असा संदेश आला: तुझे पूर्वज दावीद यांचा परमेश्वर म्हणतो, “यहोरामा, तुझे आचरण आपले पिता यहोशाफाट यांच्या सारखे नाही. यहूदाचा राजा आसा याच्यासारखे तुझे वर्तन नाही. उलट तू इस्राएलच्या राजांचा कित्ता गिरवला आहेस. यहूदा आणि यरूशलेममधील लोकांस तू परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागायला लावले आहेस. अहाब आणि त्याचे घराणे यांनी हेच केले. ते परमेश्वराशी एकनिष्ठ राहिले नाहीत. तू स्वत:च्या भावांची हत्या केलीस. ते तुझ्यापेक्षा वर्तणुकीने चांगले होते. तेव्हा परमेश्वर आता तुझ्या लोकांस जबर शासन करणार आहे तुझी अपत्ये पत्नी, मालमत्ता यांना परमेश्वर शिक्षा करणार आहे. तुला आतड्यांचा भयंकर आजार होईल आणि तो दिवसेदिवस बळावेल. त्यामध्ये तुझी आतडी बाहेर पडतील.” कूशी लोकांच्या शेजारचे अरब आणि पलिष्टी लोक यांना परमेश्वराने यहोरामाविरुध्द भडकावले. या लोकांनी यहूदावर स्वारी केली आणि त्यांनी राजाच्या महालातली सगळी घनदौलत लुटून नेली. यहोरामाच्या पत्नी-अपत्यानाही त्यांनी पळवून नेले. फक्त यहोआहाज हा सगळ्यात धाकटा पुत्र तेवढा बचावला. या सगळ्या घडामोडींनंतर परमेश्वराने यहोरामाला आतड्यांच्या असाध्य अशा रोगाने आजारी केले. त्या आजारात दोन वर्षांनी त्यांची आतडी बाहेर आली. असह्य वेदना होऊन तो मरण पावला. लोकांनी त्याच्या वडलांच्या सन्मानार्थ जसा मोठा अग्नी पेटवला होता तसा यहोरामाच्या सन्मानार्थ पेटवला नाही. यहोराम सत्तेवर आला तेव्हा बत्तीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये आठ वर्षे राज्य केले. त्याच्या मृत्यूचे कोणालाही दु:ख झाले नाही. लोकांनी दावीद नगरातच त्याचे दफन केले, पण राजासाठी असलेल्या कबरेत नव्हे.

सामायिक करा
२ इतिहास 21 वाचा

२ इतिहास 21:8-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला. मग यहोराम आपले अधिकारी व सर्व रथ घेऊन साईर येथे गेला. रात्रीच्या वेळी त्याने उठून ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, परंतु रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला. आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहने बंड केले, कारण यहोरामने त्याच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता. त्याने यहूदीयाच्या टेकड्यांवर उच्च स्थानेही बांधली आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले होते आणि यहूदीयाला चुकीच्या मार्गाने नेले होते. यहोरामला एलीयाह संदेष्ट्याकडून एक पत्र मिळाले, त्यामध्ये लिहिले होते: “तुमचे पिता दावीदाचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुम्ही तुमचे पिता यहोशाफाट किंवा यहूदीयाचा राजा आसा यांच्या मार्गांचे अनुसरण केले नाही. परंतु तुम्ही इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि अहाबाच्या घराण्याने जसे केले त्याप्रमाणे तुम्ही यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले आहे. तुम्ही स्वतःच्या भावांची, स्वतःच्या कुटुंबातील लोकांची, तुमच्यापेक्षा चांगले असलेल्या पुरुषांचीही हत्या केली आहे. तर आता याहवेह तुमच्या लोकांवर, तुमच्या मुलांवर, तुमच्या स्त्रियांवर आणि तुमच्या सर्व गोष्टींवर जोरदार प्रहार करणार आहेत. तुमची आतडी बाहेर पडेपर्यंत तुम्ही आतड्यांसंबंधीच्या दीर्घकाळच्या आजाराने खूप त्रस्त व्हाल.” याहवेहनी यहोरामच्या विरुद्ध पलिष्टी लोकांचे आणि कूशी लोकांच्या जवळ राहणार्‍या अरब लोकांचे शत्रुत्व जागृत केले. त्यांनी यहूदीयावर हल्ला केला, त्यावर आक्रमण केले आणि राजाच्या राजवाड्यात सापडलेली सर्व मालमत्ता, त्याची मुले आणि स्त्रियांना घेऊन गेले. सर्वात धाकटा यहोआहाज याच्याशिवाय एकही पुत्र त्याच्याकडे राहिला नव्हता. हे सर्व झाल्यानंतर याहवेहनी यहोरामला आतड्यांच्या असाध्य आजाराने त्रस्त केले. याकाळाच्या दरम्यान, दुसऱ्या वर्षाच्या शेवटी या रोगामुळे त्याची आतडी बाहेर आली आणि तो अत्यंत वेदनांनी मरण पावला. त्याच्या लोकांनी त्याच्या सन्मानार्थ अंत्यसंस्कार केले नाहीत, जसे त्याच्या पूर्वजांसाठी केले होते. यहोराम राजा झाला तेव्हा तो बत्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. तो मरण पावला याचे कोणालाही दुःख वाटले नाही आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरला गेला, परंतु राजांच्या कबरेत पुरले नाही.