२ इतिहास 19:11
२ इतिहास 19:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अमऱ्या हा मुख्य याजक आहे. परमेश्वराच्या बाबतीतल्या सर्व गोष्टींमध्ये त्याचे वर्चस्व राहील आणि इश्माएलचा पुत्र जबद्या, राजाच्या बाबतीतल्या सर्व गोष्टीविषयी मुखत्यार म्हणून नेमलेला आहे. जबद्या हा यहूदा वंशाचा अधिकारी आहे. लेवी हे लेखनिक कारभारी म्हणून तुमच्या दिमतीला आहेत. जे जे कराल ते धैर्याने करा. उचित तेच करणाऱ्यांना परमेश्वराची साथ असो.”
२ इतिहास 19:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“याहवेह संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर मुख्य याजक अमर्याह तुमच्यावर असेल आणि राजाच्या संबंधित कोणतेही प्रकरण असेल तर यहूदीयाच्या वंशाचा प्रमुख इश्माएलचा मुलगा जबद्याह तुमच्यावर असेल आणि लेवी तुमच्यापुढे अधिकारी म्हणून काम करतील. धैर्याने वागा आणि जे चांगले काम करतात त्यांच्याबरोबर याहवेह असतील.”
२ इतिहास 19:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, परमेश्वराविषयीच्या सर्व प्रकरणांत मुख्य याजक अमर्या ह्याला तुमच्यावर नेमले आहे, आणि राजासंबंधीच्या सर्व प्रकरणांत यहूदा वंशाचा सरदार जबद्या बिन इस्राएल ह्याला तुमच्यावर नेमले आहे; आणि लेवी हेही तुमच्या दिमतीस असतील. हिंमत धरा, आपले कर्तव्य करा, परमेश्वर भल्यांच्या बरोबर असणार.”