YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 17:7-19

२ इतिहास 17:7-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून यहूदी लोकांस शिकवण द्यायला पाठवले. बेन-हईल, ओबद्या, जखऱ्या, नथनेल आणि मीखाया हे ते सरदार होते. त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असाएल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवीचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले. हे सरदार, लेवी आणि याजक सर्व लोकांस शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातील गावोगावी जाऊन ते लोकांस शिकवत गेले. यहूदाच्या आसपासच्या राजसत्तांनी परमेश्वराची धास्ती घेतली, त्यामुळे त्यांनी यहोशाफाटाबरोबर युध्द केले नाही. कित्येक पलिष्टयांनी यहोशाफाटासाठी चांदीच्या भेटी आणल्या. काही अरबी शेळ्यामेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे सात हजार सातशे मेंढेरे आणि सात हजार सातशे बोकड त्यास दिले. यहोशाफाटाचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारांची नगरे बांधली. यहूदाच्या नगरात त्याची भरपूर कामे चालत असत. यरूशलेमामध्ये यहोशाफाटाने चांगली बळकट, धीट लढाऊ माणसेही ठेवली. आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे यहूदातील सरदार असे अदना हा तीन लाख सैनिकांचा सेनापती होता. यहोहानानाच्या हाताखाली दोन लाख ऐंशी हजार सैनिक होते. जिख्रीचा पुत्र अमस्या हा त्या खालोखाल दोन लाख योध्दाचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते. बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत दोन लाख सैनिक धनुष्यबाण आणि ढाल वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता. यहोजाबादाकडे युध्दसज्ज असे एक लाख ऐंशी हजार पुरुष होते. ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. याखेरीज यहूदाच्या सर्व नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.

सामायिक करा
२ इतिहास 17 वाचा

२ इतिहास 17:7-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याने आपल्या कारकिर्दीच्या तिसर्‍या वर्षी आपले सरदार बेन-हईल, ओबद्या, जखर्‍या, नथनेल व मीखाया ह्यांना यहूदाच्या नगरांना शिस्त लावण्यासाठी पाठवले; त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असाएल, शमीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया, तोब-अदोनीया हे लेवी आणि अलीशामा व अहोराम हे याजक त्याने पाठवले. त्यांनी आपल्याबरोबर परमेश्वराच्या नियमशास्त्राचा ग्रंथ घेऊन यहूदाच्या नगरात जाऊन शिक्षण दिले; यहूदाच्या सर्व नगरांत फिरून त्यांनी लोकांना शिकवले. यहूदाच्या आसपासच्या सर्व देशांच्या राजांना परमेश्वराचा असा धाक बसला की त्यांनी यहोशाफाटाशी युद्ध केले नाही. कित्येक पलिष्ट्यांनी यहोशाफाटास भेटी व खंडणी म्हणून चांदी आणली; अरबी लोक सात हजार सातशे मेंढरे व सात हजार सातशे बकरी ह्यांचे कळप घेऊन त्याच्याकडे आले. यहोशाफाट फार थोर झाला व त्याने यहूदात गढ्या व भांडारनगरे बांधली. यहूदाच्या नगरात त्याची मोठमोठी कामे चालत; यरुशलेमेत त्याचे शूर वीर राहत. त्यांच्या पितृकुळांप्रमाणे त्यांची गणती ही : यहूदाच्या सहस्रपतींचा अदना नायक असून त्याच्याबरोबर तीन लक्ष शूर वीर होते; त्याच्या खालोखाल यहोहानान नायक असून त्याच्याबरोबर दोन लक्ष ऐंशी हजार पुरुष होते, त्याच्या खालोखाल जिख्रीचा पुत्र अमस्या हा असून त्याने आपल्या खुशीने स्वतःस परमेश्वराला वाहून घेतले होते; त्याच्याबरोबर दोन लक्ष शूर वीर होते; बन्यामिन्यांपैकी एल्यादा हा एक महान योद्धा असून त्याच्याबरोबर धनुर्धारी व लढवय्ये दोन लक्ष लोक होते; त्याच्या खालोखाल यहोजाबाद हा असून त्याच्याबरोबर युद्धास तयार असे एक लक्ष ऐंशी हजार पुरुष होते; हे सर्व राजाच्या तैनातीस असत; राजाने यहूदाच्या सर्व तटबंदी नगरांतून लष्कर ठेवले होते ते वेगळेच.

सामायिक करा
२ इतिहास 17 वाचा