1 तीमथ्य 4:1-2
1 तीमथ्य 4:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील, ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील.
1 तीमथ्य 4:1-2 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पवित्र आत्मा स्पष्ट सांगतो की शेवटच्या काळात कित्येक लोक विश्वासापासून दूर जातील आणि धूर्त व दुष्टात्माच्या शिक्षणावर मन लावतील. ज्या लबाड बोलणार्या माणसाची सदसद्विवेकबुद्धी तापलेल्या लोखंडाने डागलेली अशी आहे.
1 तीमथ्य 4:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळात विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील; ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणार्या माणसांच्या ढोंगाने ते फुसलावणार्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील
1 तीमथ्य 4:1-2 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पवित्र आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. ते फूस लावणाऱ्या आत्म्यांच्या व भुतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. ज्यांची सदसद्विवेकबुद्धी तप्त लोखंडाने डाग देऊन मारून टाकल्यासारखी झाली आहे, असे लबाड लोक ही खोटी शिकवणूक पसरवतात.