१ शमुवेल 8:4-8
१ शमुवेल 8:4-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर इस्राएलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमुवेलाकडे आले. ते त्याला म्हणाले, “पाहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाहीत; तर आता इतर सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्यायनिवाडा करायला आमच्यावर एक राजा नेमा.” “आमचा न्यायनिवाडा करायला आम्हांला एक राजा द्या,” असे ते म्हणाले त्यामुळे शमुवेलास वाईट वाटले. मग शमुवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वर शमुवेलाला म्हणाला, “लोक जे तुला सांगत आहेत ते सगळे ऐक; कारण त्यात ते तुझा धिक्कार करत नाहीत, तर मी त्यांचा राजा नसावे म्हणून ते माझाच धिक्कार करत आहेत. मी त्यांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्याशी त्यांनी असेच वर्तन केले आहे; त्यांनी मला सोडून अन्य देवांची उपासना केली; तसेच ते तुझ्याशी वर्तन करत आहेत.
१ शमुवेल 8:4-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग इस्राएलाचे सर्व वडील जमून रामा येथे शमुवेलाकडे आले. आणि ते त्यास म्हणाले, “पाहा तुम्ही वयोवृद्ध झाले आहात आणि तुमचे पुत्र तुमच्या मार्गाने चालत नाहीत. आता सर्व राष्ट्रांप्रमाणे आमचा न्याय करायला आम्हावर राजा नेमा.” परंतु, “आमचा न्याय करायला आम्हांला राजा द्या,” असे जे त्यांनी म्हटले, त्याबद्दल शमुवेलाला वाईट वाटले. म्हणून शमुवेलाने परमेश्वराकडे प्रार्थना केली. तेव्हा परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “लोक सांगतात त्या सर्वबाबतीत तू त्यांचा शब्द ऐक; कारण त्यांनी तुला नाकारले नाही, तर मला नाकारले आहे. मी त्यांना मिसरातून वर आणले त्या दिवसापासून आजपर्यंत जी सर्व कामे त्यांनी केली त्याप्रमाणे त्यांनी हे केले आहे, मला सोडून अन्य देवाची सेवा त्यांनी केली, आणि तसेच त्यांनी तुझ्याशी केले आहे.”