१ शमुवेल 18:10-11
१ शमुवेल 18:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग दुसऱ्या दिवशी असे झाले; देवापासून दुष्ट आत्मा शौलावर जोराने आला तेव्हा तो घरात बडबडत होता. म्हणून दावीद रोजच्याप्रमाणे आपल्या हाताने वाद्य वाजवीत होता. शौलाच्या हाती त्याचा भाला होता. तेव्हा शौलाने भाला मारण्यासाठी उगारला कारण त्याने म्हटले, “मी दावीदाला मारून भिंतीशी खिळीन.” परंतु दावीद त्याच्या समोरून दोनदा निसटून गेला.
१ शमुवेल 18:10-11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दुसर्या दिवशी परमेश्वराकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा शौलावर जोराने उतरला, तेव्हा तो आपल्या घरात भविष्यवाणी करू लागला. दावीद रोजच्याप्रमाणे आपली वीणा वाजवित होता व शौलाच्या हाती भाला होता “मी दावीदाला भिंतीशी खिळून टाकीन” असे म्हणत शौलाने भाला फेकला, परंतु दावीदाने त्याला दोनदा चुकविले.
१ शमुवेल 18:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दुसर्या दिवशी शौलाच्या ठायी देवाकडील दुरात्मा जोराने संचरला, व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला; दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे वीणा वाजवत होता; आणि शौलाच्या हाती भाला होता. शौलाने त्याला मारायला भाला उगारला; तो म्हणाला की, “भाला मारून दाविदाला भिंतीशी खिळावे;” पण दाविदाने त्याच्यासमोरून एकीकडे सरकून त्याला दोनदा चुकवले.