YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 17:50-53

१ शमुवेल 17:50-53 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

असे करून दावीदाने गोफण व दगड यांनी पलिष्ट्याला जिंकले आणि त्याचा पराभव करून त्यास मारिले. परंतु दावीदाच्या हाती तलवार नव्हती. तेव्हा दावीद धावत जाऊन त्या पलिष्ट्यावर उभा राहिला आणि त्याचीच तलवार त्याच्या म्यानातून काढिली आणि तिच्याने त्याचे मुडंके कापून त्यास ठार मारले. मग आपला युद्धवीर मेला आहे हे पाहून पलिष्टी पळाले. तेव्हा इस्राएल व यहूदीयांच्या मनुष्यांनी उठून आरोळी मारली, आणि खोऱ्यापर्यंत व एक्रोनाच्या वेशीपर्यंत ते पलिष्ट्यांच्या पाठीस लागले. पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोनापर्यंत जखमी होऊन पडले. मग इस्राएलाची संताने पलिष्ट्यांचा पाठलाग सोडून माघारे आली आणि त्यांनी त्यांची छावणी लुटली.

सामायिक करा
१ शमुवेल 17 वाचा

१ शमुवेल 17:50-53 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

अशाप्रकारे, दावीदाने त्या पलिष्ट्यावर गोफण व गोट्याद्वारे विजय मिळविला; त्याच्या हाती तलवार नसताना त्याने त्या पलिष्ट्याला मारून टाकले. दावीद धावत जाऊन त्याच्यावर उभा राहिला, त्याने त्या पलिष्ट्याच्या म्यानातून तलवार काढून त्या तलवारीनेच त्याचे डोके कापले. जेव्हा पलिष्ट्यांनी पाहिले की त्यांचा नायक मरण पावला त्यांनी तिथून पळ काढला. तेव्हा इस्राएली व यहूदीयाच्या सैनिकांनी उठून आरोळी केली, त्यांनी गथ व एक्रोनच्या वेशींपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग केला. मरण पावलेले पलिष्टी शाराईमाच्या वाटेवर गथ व एक्रोन येथवर पडलेले होते. इस्राएली लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले व त्यांची छावणी लुटली.

सामायिक करा
१ शमुवेल 17 वाचा

१ शमुवेल 17:50-53 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्या प्रकारे दाविदाने गोफणगुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली आणि त्याचा वध केला; दाविदाच्या हाती तलवार नव्हती. दाविदाने धावत जाऊन त्या पलिष्ट्याच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदले. आपला महावीर गतप्राण झाला हे पाहून पलिष्टी पळून गेले. मग इस्राएल व यहूदी उठले आणि रणशब्द करत गथ व एक्रोन ह्यांच्या वेशीपर्यंत पलिष्ट्यांचा पाठलाग करीत गेले, आणि पलिष्टी शाराईमाच्या वाटेत गथ व एक्रोन येथवर घायाळ होऊन पडले. मग इस्राएल लोक पलिष्ट्यांचा पाठलाग करण्याचे सोडून परत आले; व त्यांनी त्यांची छावणी लुटली.

सामायिक करा
१ शमुवेल 17 वाचा