१ शमुवेल 17:38-40
१ शमुवेल 17:38-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा शौलाने आपली वस्त्रे दावीदावर घातली आणि डोक्यावर पितळेचा टोप घातला आणि त्याच्यावर चिलखत घातले. दावीदाने त्याची तलवार आपल्या वस्त्राभोवती बांधिली मग तो चालू लागला. त्याने कधीही ती वापरली नव्हती. तेव्हा दावीदाने शौलाला म्हटले, “याच्याने मला चालवत नाही. कारण त्यास त्याची सवय नव्हती.” मग दावीदाने शौलाला म्हटले, ही घेऊन माझ्याने चालवत नाही कारण याची पारख मी कधी केली नाही. तेव्हा दावीदाने ती आपल्या अंगातून काढली. त्याने आपली काठी हातात घेऊन ओहाळातून पाच गुळगुळीत गोटे आपल्यासाठी निवडून घेतले आणि त्याने त्याच्याजवळ जी मेंढपाळाची पिशवी होती, तीच्यात ते ठेवले व आपली गोफण हातात घेऊन पलिष्ट्याजवळ तो जाऊ लागला.
१ शमुवेल 17:38-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शौलाने आपली वस्त्रे दावीदाच्या अंगावर चढविली, त्याच्यावर चिलखत चढविले आणि त्याच्या डोक्यावर कास्य टोप घातला. दावीदाने त्याच्या चिलखतावर तलवार बांधली, त्याला याचा आधी सराव नसल्यामुळे, त्याने चालण्याचा प्रयत्न केला. तो शौलाला म्हणाला, “मी यामध्ये चालू शकत नाही, मला याचा सराव नाही.” म्हणून दावीदाने तो पोशाख उतरविला. नंतर त्याने आपली काठी हातात घेतली, ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे घेतले व ते आपल्या धनगरी बटव्यात ठेवले व आपली गोफण हाती घेऊन त्या पलिष्ट्याकडे गेला.
१ शमुवेल 17:38-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शौलाने आपला पेहराव दाविदाला लेववला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढवले. दावीद आपली तलवार आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला; कारण त्याला ह्यापूर्वी त्याचा सराव नव्हता. दावीद शौलाला म्हणाला, “हे घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला ह्यांचा सराव नाही;” म्हणून दाविदाने ते उतरवून ठेवले. मग त्याने आपली काठी हाती घेतली; ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले, आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला.