१ शमुवेल 11:1-15
१ शमुवेल 11:1-15 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर अम्मोनी नाहाश ह्याने स्वारी करून याबेश-गिलादासमोर तळ दिला; तेव्हा याबेशचे सर्व लोक नाहाश ह्याला म्हणाले की, “आमच्याशी करारमदार कर म्हणजे आम्ही तुझे अंकित होऊ.” नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हा सर्वांचा उजवा डोळा फोडून अवघ्या इस्राएलाची अप्रतिष्ठा करीन, ह्या अटीवर मी तुमच्याशी करार करीन.” याबेशच्या वडील लोकांनी त्याला म्हटले, “आम्हांला सात दिवसांचा अवकाश द्या म्हणजे तेवढ्यात इस्राएल लोकांच्या सर्व प्रांतांत आम्ही जासूद पाठवू; आणि जर आमचा बचाव करण्यासाठी कोणी आला नाही तर मग आम्ही बाहेर निघून तुमच्याकडे येऊ.” मग जासुदांनी शौलाच्या गिब्यास जाऊन हे वर्तमान लोकांच्या कानांवर घातले; ते ऐकून सर्व लोक गळा काढून रडू लागले. तेव्हा शौल गुरांच्या मागून शेतातून येत होता; त्याने विचारले, “लोक का रडतात? त्यांना काय झाले?” याबेशच्या लोकांचे म्हणणे त्यांनी त्याला कळवले. शौलाने हे वर्तमान ऐकताच देवाचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने येऊन तो मनस्वी संतप्त झाला. त्याने एक बैलाची जोडी कापून त्यांचे तुकडे केले व ते जासुदांच्या हाती इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवले आणि त्यांना निरोप दिला की, “जो कोणी शौल व शमुवेल ह्यांच्यामागे येणार नाही त्यांच्या बैलांची अशीच गत होईल.” तेव्हा परमेश्वराची दहशत लोकांवर बसून ते एकचित्ताने बाहेर निघाले. त्याने बेजेक येथे त्यांची टीप घेतली तेव्हा इस्राएलाचे तीन लक्ष पुरुष व यहूदाचे तीस हजार पुरुष भरले. त्यांनी त्या आलेल्या जासुदांना सांगितले, “तुम्ही याबेश-गिलादाच्या लोकांना जाऊन सांगा की, ‘उद्या ऊन होण्याच्या सुमारास तुम्हांला कुमक येऊन पोहचेल.” त्या जासुदांनी जाऊन याबेशच्या लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. मग याबेशच्या लोकांनी सांगून पाठवले की, “आम्ही उद्या बाहेर निघून तुमच्याकडे येऊ, मग तुमच्या मनास येईल तसे आमचे करा.” दुसर्या दिवशी शौलाने आपल्या लोकांच्या तीन तुकड्या केल्या आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी (पहाटे) त्यांनी छावणीत येऊन ऊन होईपर्यंत अम्मोन्यांची कत्तल केली; आणि जे बाकी राहिले त्यांची एवढी दाणादाण केली की त्यांच्यातले दोनसुद्धा एकत्र राहिले नाहीत. मग लोकांनी शमुवेलास विचारले, “हा शौल आमच्यावर राज्य करणार काय, असे जे म्हणाले ते कोणते लोक? त्यांना बाहेर काढा म्हणजे आम्ही त्यांना मारून टाकू.” शौल म्हणाला, “आज कोणाही मनुष्याचा वध करायचा नाही; कारण आज परमेश्वराने इस्राएलाचा उद्धार केला आहे.” मग शमुवेल लोकांना म्हणाला, “चला, आपण गिलगालास जाऊ व तेथे राज्याची पुन्हा स्थापना करू.” तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले व तेथे त्यांनी परमेश्वरासमोर शौलाला राजा केले; तेथे त्यांनी परमेश्वराला शांत्यर्पणाचे यज्ञ केले; शौल व इस्राएल लोक ह्यांनी तेथे मोठा उत्सव केला.
१ शमुवेल 11:1-15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व मनुष्यांनी नाहाशाला म्हटले, “आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.” तेव्हा नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हाशी अशा अटीवर करार करीन की, मी तुम्हातील प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून सर्व इस्राएलाची मानहानी करीन.” तेव्हा याबेशच्या वडिल जनांनी त्यास म्हटले, “आम्हांला सात दिवसाचा अवकाश दे, म्हणजे इस्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू. मग जर आम्हास सोडवायला कोणी येत नसला, तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ.” आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे येऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या; तेव्हा सर्व लोक मोठ्याने आवाज काढून रडू लागले. आणि पाहा शौल शेतातून गाईबैलांच्या मागून चालत येत होता. शौल म्हणाला, “लोकांस काय झाले? म्हणून ते रडत आहेत?” तेव्हा त्यांनी त्यास याबेशातील माणसे काय म्हणाली ते सांगितले. तेव्हा शौलाने या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला. मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की, “जो कोणी शौलामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल.” तेव्हा परमेश्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे होऊन एकत्र होऊन निघाले. मग जेव्हा त्याने बेजेकात त्यांची नोंद केली, तेव्हा इस्राएलाचे लोक तीन लाख होते, आणि यहूदाचे लोक तीस हजार होते. तेव्हा जे दूत आले होते त्यांना त्यांनी म्हटले, “याबेश-गिलादाच्या मनुष्यांना असे सांगा की, उद्या सूर्य तापेल तेव्हा तुमची सुटका होईल.” मग दूतांनी जाऊन याबेशाच्या मनुष्यांना तसे सांगितले; तेव्हा ते आनंदीत झाले. मग याबेशांतील माणसे नाहाशाला म्हणाली, “उद्या आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ तेव्हा तुम्हास बरे दिसेल तसे आमचे करा.” मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापे पर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यातले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली. मग लोक शमुवेलाला म्हणाले, “शौल आम्हावर राज्य करील काय? असे जे बोलले ते कोण आहेत? ती माणसे काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.” तेव्हा शौल बोलला, “आज कोणाही मनुष्यास जिवे मारायचे नाही कारण आज परमेश्वराने इस्राएलास सोडवले आहे.” तेव्हा शमुवेलाने लोकांस म्हटले, “चला आपण गिलगालास जाऊन तेथे नव्याने राज्य स्थापन करू.” मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी परमेश्वराच्यासमोर शौलाला राजा केले आणि तेथे परमेश्वराच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले; तेव्हा तेथे शौल व इस्राएलाची सर्व माणसे यांना फार आनंद झाला.
१ शमुवेल 11:1-15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अम्मोनी नाहाश याने जाऊन याबेश-गिलआदला वेढा घातला. याबेशचे सर्व पुरुष त्याला म्हणाले, “आमच्यासह एक करार कर, म्हणजे आम्ही प्रजा होऊन तुमची सेवा करू.” परंतु अम्मोनी नाहाश म्हणाला, “मी एकाच अटीवर तुमच्याशी करार करेन की मी तुम्हा प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून संपूर्ण इस्राएलवर अप्रतिष्ठा आणेन.” याबेशचे वडील त्याला म्हणाले, “आम्हाला सात दिवसांचा अवकाश दे म्हणजे आम्ही संपूर्ण इस्राएलमध्ये निरोप पाठवू; जर आमची सुटका करण्यासाठी कोणी आला नाही तर आम्ही तुला स्वाधीन होऊ.” जेव्हा निरोप्यांनी शौलाच्या गिबियाह येथे जाऊन तेथील लोकांस हे वर्तमान दिले, तेव्हा त्या सर्वांनी मोठ्याने आकांत केला. त्याचवेळेस शौल त्याच्या बैलांमागून शेतातून परत येत होता, त्याने विचारले, “प्रत्येकाला काय झाले आहे? ते का रडत आहेत?” तेव्हा याबेशाच्या लोकांनी जे काही सांगितले होते ते त्यांनी त्याला सांगितले. जेव्हा शौलाने त्यांचे शब्द ऐकले, तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्यावर सामर्थ्याने आला आणि तो क्रोधाने पेटला. त्याने बैलाची एक जोडी कापून त्यांचे तुकडे केले आणि निरोप्यांच्या हाती ते तुकडे सर्व इस्राएलमध्ये पाठविले आणि जाहीर केले, “जे कोणी शौल आणि शमुवेल यांचे अनुसरण करणार नाही, त्यांच्या बैलांचे असेच केले जाईल.” तेव्हा लोकांना याहवेहचे भय वाटू लागले आणि ते एकजूट होऊन बाहेर आले. बेजेक येथे शौलाने त्यांची मोजणी केली, तेव्हा ते तीन लाख इस्राएली पुरुष होते आणि यहूदाहचे तीस हजार पुरुष होते. जे निरोप घेऊन आले होते त्यांना त्यांनी सांगितले, “याबेश-गिलआदच्या पुरुषांना सांगा, ‘उद्या सूर्य तापलेला असेल, त्या वेळेपर्यंत तुमची सुटका केली जाईल.’ ” जेव्हा निरोप्यांनी जाऊन हे वर्तमान याबेशच्या लोकांना सांगितले तेव्हा ते आनंदित झाले. याबेशवासी अम्मोनी लोकांना म्हणाले, “उद्या आम्ही स्वतःला तुमच्या स्वाधीन करू आणि तुम्हाला आवडेल तसे तुम्ही आमचे करा.” दुसर्या दिवशी शौलाने आपल्या लोकांना तीन भागांमध्ये विभागले; रात्रीच्या शेवटच्या प्रहरी ते अम्मोन्यांच्या छावणीत घुसले आणि सूर्य तापेपर्यंत त्यांना मारून टाकले. जे वाचले त्यातील दोन व्यक्तीही एकत्र येणार नाही असे विखरून गेले. तेव्हा लोक शमुवेलास म्हणाले, “ते कोण होते ज्यांनी विचारले होते, ‘शौल आमच्यावर राज्य करेल काय?’ त्या माणसांना आमच्याकडे आणा, म्हणजे आम्ही त्यांना जिवे मारू.” परंतु शौल म्हणाला, “आज कोणालाही जिवे मारले जाणार नाही, कारण आज याहवेहने इस्राएलची सुटका केली आहे.” नंतर शमुवेल लोकांना म्हणाला, “चला आपण गिलगालास जाऊ आणि तिथे राजपदाची पुनर्स्थापना करू.” तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले आणि त्यांनी याहवेहच्या उपस्थितीत शौलाला राजा केले. तिथे त्यांनी याहवेहसमोर शांत्यर्पणाचे यज्ञ केले आणि शौलाने आणि सर्व इस्राएली लोकांनी मोठा उत्सव साजरा केला.