YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 5:7-11

1 पेत्र 5:7-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो. सावध रहा; जागृत रहा कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावे म्हणून शोधीत फिरतो. तुम्ही विश्वासात स्थिर राहून त्याच्याविरुध्द उभे रहा कारण तुम्ही जाणता की, जगात असलेल्या तुमच्या बांधवांवर तशीच दुःखे आणली जात आहेत. पण तुम्हास ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हास परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील. त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.

सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा

1 पेत्र 5:7-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुमच्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण ते तुमची काळजी घेतात. सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाचा नाश करावा म्हणून शोधीत फिरतो. विश्वासामध्ये दृढ उभे राहून त्याचा विरोध करा, कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभरातील विश्वासी लोकांच्या कुटुंबांना अशाच प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत. तुम्ही थोडा वेळ दुःख सहन केल्यावर, सर्व कृपेचा परमेश्वर ज्यांनी तुम्हाला त्यांच्या सार्वकालिक गौरवामध्ये येण्यासाठी ख्रिस्तामध्ये आमंत्रित केले आहे, ते स्वतः तुमची पुनर्स्थापना करतील आणि तुम्हाला सशक्त, दृढ आणि स्थिर करतील. त्यांना सदासर्वकाळ अधिकार असो. आमेन.

सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा

1 पेत्र 5:7-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्याच्यावर तुम्ही ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्‍या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दु:खे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील. त्याला गौरव व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.

सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा

1 पेत्र 5:7-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, दक्ष राहा! तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा एखाद्याला गिळावे म्हणून शोधत फिरतो आहे. त्याच्याविरुद्ध दृढ विश्वासाने असे उभे राहा, कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. आपल्या शाश्वतवैभवात तुम्ही यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो कृपावंत देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला परिपूर्ण करील व तुम्हांला स्थैर्य, शक्ती व अढळ आधार देईल. त्याच्या सामर्थ्याचा युगानुयुगे गौरव असो. आमेन.

सामायिक करा
1 पेत्र 5 वाचा

1 पेत्र 5:7-11

1 पेत्र 5:7-11 MARVBSI1 पेत्र 5:7-11 MARVBSI1 पेत्र 5:7-11 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा