1 पेत्र 5:10-14
1 पेत्र 5:10-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तुम्हास ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हास परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील. त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. मी ज्या सिल्वानला विश्वासू बंधू म्हणून मानतो त्याच्याहाती तुम्हास थोडक्यात लिहून पाठवून, बोध करतो आणि साक्ष देतो की, ही देवाची खरी कृपा आहे. त्यामध्ये तुम्ही स्थिर रहा. बाबेल येथील, तुमच्या जोडीची निवडलेली मंडळी तुम्हास सलाम पाठवत आहे आणि माझा मुलगा मार्क हाही पाठवत आहे प्रीतीच्या अभिवादनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.
1 पेत्र 5:10-14 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही थोडा वेळ दुःख सहन केल्यावर, सर्व कृपेचा परमेश्वर ज्यांनी तुम्हाला त्यांच्या सार्वकालिक गौरवामध्ये येण्यासाठी ख्रिस्तामध्ये आमंत्रित केले आहे, ते स्वतः तुमची पुनर्स्थापना करतील आणि तुम्हाला सशक्त, दृढ आणि स्थिर करतील. त्यांना सदासर्वकाळ अधिकार असो. आमेन. सीलास ज्याला मी एकनिष्ठ भाऊ असे मानतो याच्या मदतीने मी तुम्हाला थोडक्यात लिहिले आहे, तुम्हाला उत्तेजित करतो आणि अशी साक्ष देतो की, हीच परमेश्वराची खरी कृपा आहे. यामध्येच स्थिर राहा. जी बाबेलमध्ये आहे ती, तुमच्याबरोबर एकत्र निवडलेली, तुम्हाला तिच्या शुभेच्छा पाठविते, आणि माझा पुत्र मार्क तुम्हाला शुभेच्छा पाठवितो. प्रीतीच्या चुंबनांनी एकमेकांना शुभेच्छा द्या.
1 पेत्र 5:10-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील. त्याला गौरव व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहवून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा. बाबेलातील तुमच्यासारखी निवडलेली मंडळी तुम्हांला सलाम सांगते; आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो. प्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.
1 पेत्र 5:10-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्या शाश्वतवैभवात तुम्ही यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो कृपावंत देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला परिपूर्ण करील व तुम्हांला स्थैर्य, शक्ती व अढळ आधार देईल. त्याच्या सामर्थ्याचा युगानुयुगे गौरव असो. आमेन. माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहून पाठवीत आहे. ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा. बाबेलमधील तुमच्यासारखी निवडलेली ख्रिस्तमंडळी तसेच माझा मुलगा मार्क तुम्हांला शुभेच्छा पाठवीत आहेत. बंधुप्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना वंदन करा. सर्व ख्रिस्ती बंधुभगिनींना शांतीचे वरदान मिळो.