1 पेत्र 3:21-22
1 पेत्र 3:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा; देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो. तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.
1 पेत्र 3:21-22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते पाणी आपल्यासाठी बाप्तिस्म्याचे चित्र असे आहे, ते आता तुम्हालासुद्धा वाचवते, परंतु शरीराची घाण काढून नाही तर परमेश्वराकडे सदसद्विवेकबुद्धीची प्रतिज्ञा केल्याने. ते तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे वाचवते. ते येशू आता स्वर्गात गेले आहेत आणि परमेश्वराच्या उजवीकडे असून स्वर्गदूतांबरोबर, अधिकार आणि सत्ता त्यांच्या अधीन आहेत.
1 पेत्र 3:21-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता ‘बाप्तिस्मा’ येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे, असा आहे. तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता ‘देवाच्या उजवीकडे’ आहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.
1 पेत्र 3:21-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे बाप्तिस्मा तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मल धुऊन टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने परमेश्वराला दिलेले वचन असा आहे. येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश यांच्यावर तो सत्ता चालवितो.