1 पेत्र 3:18-19
1 पेत्र 3:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला. आणि तो त्याद्वारे गेला व त्याने तुरूंगातल्या आत्म्यांना घोषणा केली.
1 पेत्र 3:18-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नीतिमान असताना अनीतिमान लोकांना, तुम्हाला परमेश्वराकडे न्यावे म्हणून ख्रिस्तानेसुद्धा पापांसाठी एकदाच दुःख सोसले, शारीरिक दृष्टीने त्यांचा मृत्यू झाला होता, परंतु आत्म्यामध्ये त्यांना जिवंत केले होते. जिवंत झाल्यानंतर येशू गेले आणि बंदीशाळेतील आत्म्यांना संदेश दिला
1 पेत्र 3:18-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात2 जिवंत केला गेला; त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली.
1 पेत्र 3:18-19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, एकदा निर्णायक स्वरूपाचे मरण सोसले. तो देहरूपात ठार मारला गेला आणि आत्म्याच्या रूपाने जिवंत केला गेला. त्या आत्मिक अवस्थेत जाऊन त्याने बंदिवान आत्म्यांना घोषणा केली.