YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 2:5-9

1 पेत्र 2:5-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. कारण असा शास्त्रलेख आहे : “पाहा, निवडलेली, मूल्यवान अशी कोनशिला मी सीयोनेत बसवतो; तिच्यावर विश्वास ठेवणारा फजीत होणार नाही.” म्हणून तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांना ती मूल्यवान आहे; परंतु जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना, “बांधणार्‍यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला,” आणि “ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला;” ते वचन मानत नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेही होते. पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा

1 पेत्र 2:5-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुम्हीही जिवंत दगडांप्रमाणे, आत्मिक भवन असे, रचले जात आहात देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ, येशू ख्रिस्ताद्वारे, अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहात. म्हणून शास्त्रलेखातही असे आहे की, “पाहा, मी एक निवडलेला व मोलवान असलेला, कोनशिला सियोनात ठेवतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजीत होणार नाही.” म्हणून विश्वास ठेवणार्‍या तुम्हास तो मोलवान आहे; पण, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना ‘बांधणार्‍यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्‍याचा मुख्य कोनशिला झाला आहे.’ असा देखील शास्त्रलेख आहे, “अडखळण्याचा दगड व अडथळ्याचा खडक झाला आहे.” ते वचन मानीत नसल्यामुळे अडखळतात आणि त्यासाठीच ते नेमलेले होते. पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा; ह्यासाठी की, तुम्हास ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा

1 पेत्र 2:5-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर म्हणून बांधले जात आहात यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराला स्वीकारावयास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. कारण धर्मग्रंथात असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी एक दगड ठेवितो निवडलेला आणि मौल्यवान कोनशिला, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.” आता, जे तुम्ही विश्वास ठेवता, त्या तुम्हासाठी हा दगड अति मोलवान आहे. परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत, “जो दगड बांधणार्‍यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.” आणि, “लोकांना ठेच लागण्याचा दगड व अडखळण्याचे खडक ठेवितो.” ते अडखळतात, कारण ते परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालत नाहीत, ज्या शिक्षेसाठी ते पूर्वीच नेमलेले सुद्धा होते. परंतु तुम्ही निवडलेले लोक, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, परमेश्वराचे विशेष धन आहात यासाठी की ज्यांनी तुम्हाला अंधारातून काढून त्यांच्या अद्भुत प्रकाशात आणले त्यांच्या स्तुतीची घोषणा करावी.

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा

1 पेत्र 2:5-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तुम्हीही स्वतः सजीव दगडासारखे आध्यात्मिक मंदिर म्हणून रचले जात आहात, ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताद्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. असा धर्मशास्त्रलेख आहे: पाहा, निवडलेली मूल्यवान अशी कोनशिला मी सीयोनमध्ये बसवितो, तिच्यावर विश्वास ठेवणाऱ्याची फजिती होणार नाही. म्हणून तुम्हां विश्वास ठेवणाऱ्यांना ती मूल्यवान आहे, परंतु जे विश्वास ठेवीत नाहीत त्यांना, बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड तोच कोनशिला झाला. तसेच दुसरा धर्मशास्त्रलेख म्हणतो, हाच दगड ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक झाला. ते वचन मानीत नसल्यामुळे ठेचकाळतात. हीच त्यांच्यासाठी देवाची इच्छा होती. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजेशाही याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही जाहीर करावेत.

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा