YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 2:13-17

1 पेत्र 2:13-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

प्रभूकरता तुम्ही, माणसांनी स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन; आणि अधिकारी हे वाईट करणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणार्‍यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठवलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा. कारण देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे. दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा. सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. ‘देवाचे भय धरा.’ राजाचा मान राखा.

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा

1 पेत्र 2:13-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

प्रत्येक प्रकारच्या मानवी व्यवस्थेला, प्रभूकरता, आज्ञाधारक रहा. राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन राहा. जे अधिकारी असतील त्यांना आज्ञांकित रहा; कारण वाईट करणार्‍यांना शिक्षा करण्यास व चांगले करणार्‍यांची प्रशंसा करण्यास ते पाठवलेले आहेत. कारण देवाची इच्छा आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध मनुष्यांच्या अज्ञानाला गप्प करावे. तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु वाईट प्रवृतीवर पांघरूण घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता, देवाचे दास म्हणून जगावे सर्वांना मान द्या; बंधुवर्गावर प्रीती करा; देवाचे भय धरा; राजाला मान द्या.

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा

1 पेत्र 2:13-17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मनुष्यांमध्ये स्थापित केलेल्या प्रत्येक अधिकार्‍याच्या तुम्ही प्रभुकरिता अधीन असा: मग तो सर्वोच्च अधिकारी म्हणून राजासुद्धा असेल अथवा राज्यपाल असेल, कारण जे अयोग्य गोष्टी करतात त्यांना शिक्षा करण्यासाठी आणि जे योग्य गोष्टी करतात, त्यांची प्रशंसा करण्यासाठी ते परमेश्वराकडून पाठविलेले आहेत. कारण परमेश्वराची अशी इच्छा आहे की चांगली कार्ये करून तुम्ही मूर्ख लोकांची अज्ञानी बोलणी बंद करावीत. तुम्ही मुक्त आहात, परंतु तुमचे स्वातंत्र्य वाईट कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी मोकळे वापरू नका तर परमेश्वराच्या दासासारखे जगा. प्रत्येकाला योग्य आदर दाखवा. विश्वासणार्‍यांच्या कुटुंबावर प्रीती करा. परमेश्वराचे भय बाळगा व राजाचा मान राखा.

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा

1 पेत्र 2:13-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

प्रभूकरिता तुम्ही, माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा. राजा श्रेष्ठ, म्हणून त्याच्या अधीन राहा. अधिकारी, हे वाईट करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करण्यासाठी व चांगले करणाऱ्यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठविलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा. देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसाचे अज्ञान दूर करावे. दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र तरी देवाचे दास असे राहा. सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. देवाचे भय धरा. राजाचा मान राखा.

सामायिक करा
1 पेत्र 2 वाचा