1 पेत्र 1:7-9
1 पेत्र 1:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.
1 पेत्र 1:7-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी. तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता. कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात.
1 पेत्र 1:7-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ही तुमच्या विश्वासाची सिद्ध निष्ठा सोन्यापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे, जे अग्नीने शुद्ध केलेले असूनही नाश पावते. जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होतील तेव्हा त्या विश्वासाची स्तुती, गौरव आणि सन्मान होऊ शकेल. त्यांना पाहिले नसतानाही, तुम्ही त्यांच्यावर प्रीती करता; ते दिसत नसतानाही, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता आणि अवर्णनीय गौरवी आनंदाने उल्हासता, कारण त्यांच्यावर विश्वास ठेवल्यामुळे पुढे मिळणारे तुमच्या आत्म्याचे तारण हे तुमचे प्रतिफळ आहे.
1 पेत्र 1:7-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.
1 पेत्र 1:7-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची पारख अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे त्याचे येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांत पर्यवसान व्हावे. त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता, आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवाचे तारण, ते उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उ्रास करता.