१ राजे 20:23-43
१ राजे 20:23-43 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अरामाच्या राजाचे सेवक त्याला म्हणाले, “त्यांचे देव पहाडी देव आहेत; म्हणूनच ते आमच्यावर प्रबळ झाले; तर आता सपाटीवर आपण त्यांच्याशी युद्ध करू म्हणजे आपण खातरीने त्यांच्यावर प्रबळ होऊ. आता एवढे मात्र करा, राजांना काढून टाका, प्रत्येकाला त्याच्या जागेवरून दूर करा; आणि त्यांच्या जागी सुभेदार नेमा; आणि आपले जे सैन्य जायबंदी झाले तेवढ्याची घोड्यास घोडा, रथास रथ अशी भरती करा; मग आपण सपाटीवर त्यांच्याशी युद्ध करू व आपण त्यांच्यावर खातरीने प्रबळ होऊ.” त्यांची ही मसलत मान्य करून बेन-हदादाने तसे केले. नवीन वर्ष लागताच बेन-हदाद अरामी लोक एकवट करून इस्राएलाशी लढण्यासाठी अफेक येथे गेला. इकडे इस्राएल लोकही एकवट होऊन व अन्नसामग्रीचा पुरवठा करून त्यांच्याशी सामना करायला गेले; इस्राएल लोकांनी त्यांच्यासमोर तळ दिला; ते बकर्यांच्या दोन कळपांसारखे भासले, पण अरामी लोकांनी देश व्यापून टाकला. तेव्हा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाकडे जाऊन सांगितले, “परमेश्वर असे म्हणतो, ‘परमेश्वर हा पहाडी देव आहे, तळवटीचा देव नाही’ असे अरामी लोक म्हणाले आहेत, ह्यास्तव हा सर्व मोठा समुदाय मी तुझ्या हाती देतो; मग मी परमेश्वर आहे अशी तुम्हांला जाणीव होईल.”’ सात दिवस ते एकमेकांसमोर तळ देऊन राहिले; सातव्या दिवशी लढाई सुरू झाली; तेव्हा इस्राएल लोकांनी एका दिवसात एक लक्ष अरामी पायदळाचा संहार केला. उरलेले लोक अफेक शहराकडे पळून जाऊन त्यात शिरले; तेव्हा शहराचा तट कोसळून त्यांच्यातल्या सत्तावीस हजार लोकांवर पडला. बेन-हदादही पळून व नगरातल्या एका घरातल्या आतल्या खोलीत लपून राहिला. त्याचे सेवक त्याला म्हणाले, “पाहा, आम्ही असे ऐकतो की इस्राएल घराण्याचे राजे दयाळू असतात; तर आमच्या कंबरांना गोणपाट गुंडाळून व गळ्यांत दोर्या बांधून आम्हांला इस्राएलाच्या राजाकडे जाऊ द्या; तो कदाचित आपला प्राण वाचवील.” त्याप्रमाणे ते कंबरांना गोणपाट गुंडाळून व गळ्यांत दोर्या बांधून इस्राएलाच्या राजाकडे जाऊन म्हणाले, “आपला दास बेन-हदाद म्हणतो, मला जीवदान द्यावे.” राजा म्हणाला, “तो अजून जिवंत आहे काय? तो तर माझा बंधू आहे.” हा शुभशकुन समजून त्यांनी त्याच्या मनात काय आहे ते समजण्यासाठी त्याचे शब्द चटकन झेलून म्हटले, “आपला बंधू बेन-हदाद!” राजा त्यांना म्हणाला, “जा, त्याला घेऊन या.” बेन-हदाद त्याच्याकडे आल्यावर त्याने त्याला आपल्या रथात घेतले. बेन-हदाद त्याला म्हणाला, “जी नगरे माझ्या बापाने आपल्या बापापासून घेतली ती मी परत देतो; माझ्या बापाने शोमरोनात पेठा वसवल्या तशाच आपणही दिमिष्कात आपल्या नावाच्या पेठा वसवा;” अहाब म्हणाला, “ह्या शर्तींवर तुला सोडून देतो,” त्याने बेन-हदादाशी करारमदार करून त्याला सोडून दिले. त्यानंतर संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एक जण परमेश्वराच्या स्फूर्तीने आपल्या सोबत्याला म्हणाला, “मला मार.” पण तो मनुष्य त्याला मारायला कबूल होईना. मग तो त्याला म्हणाला, “तू परमेश्वराचे वचन मानले नाहीस तर पाहा, माझ्याकडून तू जाताच सिंह तुला मारून टाकील.” तो त्याच्याकडून जाताच त्याला एका सिंहाने गाठून फाडून टाकले. त्या शिष्याला दुसरा मनुष्य भेटला; त्याला तो म्हणाला, “मला मार.” त्या मनुष्याने त्याला मारून घायाळ केले. मग तो संदेष्टा चालता झाला, आणि आपले डोके पागोट्याच्या पदराने झाकून राजाची मार्गप्रतीक्षा करीत रस्त्यात उभा राहिला. राजा जवळून जात असताना त्याने त्याला हाक मारून म्हटले, “आपला सेवक रणभूमीवर गेला होता तेव्हा एक मनुष्य दुसर्या एका मनुष्याला घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘ह्या मनुष्याला सांभाळ; जर का हा नाहीसा झाला तर तुझा जीव त्याच्या जिवाचा मोबदला होईल, नाहीतर तुला शंभर रत्तल रुपे दंड होईल.’ आपला सेवक इकडे तिकडे कामात गुंतला असता तो निसटून गेला.” इस्राएलाच्या राजाने त्याला म्हटले, “तोच तुझा न्याय; तू आपल्याच तोंडाने निर्णय केलास.” त्या संदेष्ट्याने आपल्या डोक्यांवरचा पागोट्याचा पदर चटकन काढला; तेव्हा हा कोणी संदेष्टा आहे असे इस्राएलाच्या राजाने ओळखले. तो राजाला म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ज्या मनुष्याचा नाश मी योजला होता तो मनुष्य तू आपल्या हातचा जाऊ दिलास तर त्याच्या प्राणाबद्दल तुझा प्राण जाईल व त्याच्या लोकांबद्दल तुझे लोक जातील.” मग इस्राएलाचा राजा उदास व खिन्न होऊन शोमरोनास आपल्या घरी गेला.
१ राजे 20:23-43 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
अरामाच्या राजाचे अधिकारी त्यास म्हणाले, “इस्राएलाचा देव हा पहाडावरील देव आहे. आपण डोंगराळ भागात लढलो. म्हणून इस्राएलांचा जय झाला. तेव्हा आता आपण सपाटीवर लढू म्हणजे जिंकू. आता तुम्ही असे करायला हवे त्या राजांकडे सैन्याचे नेतृत्व न देता त्यांच्या जागी सेनापती नेमा. जेवढ्या सेनेचा संहार झाला तेवढी पुन्हा उभी करा. घोडे आणि रथ मागवा. मग आपण सपाटीवर इस्राएली लोकांचा सामना करु म्हणजे जय आपलाच.” बेनहदादने हा सल्ला मानला आणि सर्व तजवीज केली. वसंत ऋतुत बेन-हदादने अराममधील लोकांस एकत्र आणले आणि तो इस्राएलवरील हल्ल्यासाठी अफेक येथे आला. इस्राएलही युध्दाला सज्ज झाले. अरामी सैन्याविरुध्द लढायला गेले. अराम्यांच्या समोरच त्यांनी आपला तळ दिला. शत्रूसैन्याशी तुलना करता, इस्राएल म्हणजे शेरडांच्या दोन लहान कळपांसारखे दिसत होते. अरामी फौजेने सगळा प्रदेश व्यापला होता. एक देवाचा मनुष्य (संदेष्टा) इस्राएलाच्या राजाकडे एक निरोप घेऊन आला. निरोप असा होता. “परमेश्वर म्हणतो, ‘मी डोंगराळ भागातला देव आहे असे या अरामी लोकांचे म्हणणे आहे. सपाटीवरचा मी देव नव्हे असे त्यांना वाटते. तेव्हा या मोठ्या सेनेचा मी तुमच्या हातून पराभव करणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रदेशाचा मी परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.” दोन्ही सेना सात दिवस समोरासमोर तळ देऊन बसल्या होत्या. सातव्या दिवशी लढाईला सुरुवात झाली. इस्राएल लोकांनी अरामाचे एक लक्ष सैनिक एका दिवसात ठार केले. जे बचावले ते अफेक येथे पळून गेले. यातील सत्तावीस हजार सैनिकांवर शहराची भिंत कोसळून पडली. बेन-हदादनेही या शहरात पळ काढला होता. तो एका आतल्या खोलीत लपला होता. त्याचे सेवक त्यास म्हणाले, “इस्राएलाचे राजे दयाळू आहेत असे आम्ही ऐकून आहो. आपण कबंरेस गोणताट नेसून आणि डोक्याभोवती दोरखंड आवळून इस्राएलाच्या राजाकडे जाऊ कदाचित् तो आपल्याला जीवदान देईल.” त्या सर्वांनी मग गोणताट घातले. डोक्याभोवती दोरी बांधली आणि ते इस्राएलाच्या राजाकडे आले. त्यास म्हणाले, “तुमचा दास बेन-हदाद तुमच्याकडे जीवदान मागत आहे.” अहाब म्हणाला, “म्हणजे तो अजून जिवंत आहे? तो माझा बंधूच आहे.” बेन-हदादला अहाब ठार करणार नाही अशा अर्थाचे त्याने काहीतरी आश्वासक बोलावे अशी बेनहदादच्या बरोबरच्या लोकांची इच्छा होती. तेव्हा अहाबाने बेन-हदादला भाऊ म्हटल्यावर ते ताबडतोब, “हो, बेन-हदाद तुमचा भाऊ जिवंत आहे” अहाब म्हणाल, “जा आणि त्यास आणा” त्याप्रमाणे तो आला. मग राजा अहाबाने त्यास आपल्याबरोबर रथात बसायला सांगितले. बेन-हदाद अहाबाला म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांकडून जी गावे घेतली ती मी तुला परत करीन. मग, माझ्या वडिलांनी शोमरोनात जशा बाजारपेठा वसवल्या तशा तुला दिमिष्कात करता येतील” अहाब त्यावर म्हणाला, “या करारावर ती तुला मुक्त करायला तयार आहे.” तेव्हा या दोन राजांनी आपसात शांतीचा करार केला. मग राजा अहाबाने राजा बेन-हदादला मुक्त केले. त्यानंतर संदेष्टयांच्या शिष्यापैकी एका संदेष्ट्याने दुसऱ्या संदेष्ट्याला म्हटले, “मला एक फटका मार.” परमेश्वराचीच तशी आज्ञा होती म्हणून तो असे म्हणाला, पण दुसऱ्या संदेष्ट्यांने तसे करायचे नाकारले. तेव्हा पहिला संदेष्टा म्हणाला, “तू परमेश्वराची आज्ञा पाळली नाहीस. तेव्हा तू इथून बाहेर पडशील तेव्हा सिंह तुझा जीव घेईल” तो दुसरा संदेष्टा तेथून निघाला तेव्हा खरोखरच सिंहाने त्यास ठार मारले. मग हा पहिला संदेष्टा एका मनुष्याकडे गेला. त्यास त्याने स्वत:ला “फटका मारायला” सांगितले. त्या मनुष्याने तसे केले आणि संदेष्ट्याला घायाळ केले. त्या संदेष्ट्याने मग स्वत:च्या तोंडाभोवती एक फडके गुंडाळून घेतले. त्यामुळे तो कोण हे कोणालाही ओळखू येऊ शकत नव्हते. हा संदेष्टा मग वाटेवर राजाची वाट पाहत बसला. राजा तिथून जात होता. तेव्हा संदेष्टा त्यास म्हणाला, “मी लढाईवर गेलो होतो. आपल्यापैकी एकाने एका शत्रू सैनिकाला माझ्यापुढे आणले आणि मला सांगितले, ‘याच्यावर नजर ठेव. हा पळाला तर याच्या जागी तुला आपला जीव द्यावा लागेल किंवा शंभर रत्तल चांदीचा दंड भरावा लागेल.’ पण मी इतर कामात गुंतलो होतो. तेव्हा तो मनुष्य पळून गेला यावर इस्राएलाचा राजा म्हणाला, त्या सैनिकाला तू निसटू दिलेस हा तुझा गुन्हा तुला मान्य आहे.” तेव्हा निकाल उघडच आहे. “तो मनुष्य म्हणाला ते तू केले पाहिजेस.” आता त्या संदेष्ट्याने तोंडावरचे फडके काढले. इस्राएली राजाने त्यास पाहिले आणि तो संदेष्टा असल्याचे त्याने ओळखले. मग तो संदेष्टा राजाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, मी ज्याचा वध करावा म्हणून सांगितले. त्यास तू मोकळे सोडलेस. तेव्हा आता त्याच्या जागी तू आहेस. तू मरशील. तुझ्या शत्रूच्या ठिकाणी तुझे लोक असतील तेही जिवाला मुकतील.” यानंतर इस्राएलचा राजा शोमरोनाला आपल्या घरी परतला. तो अतिशय संतापला होता आणि चितांग्रस्त झाला होता.
१ राजे 20:23-43 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या दरम्यान, अरामाच्या राजाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला, “त्यांची दैवते, डोंगरावरील दैवते आहेत. म्हणून ते आपल्यासमोर अधिक प्रबळ ठरले. परंतु आपण त्यांच्याशी जर मैदानावर लढलो, तर आपण त्यांच्यावर प्रबळ ठरू. मात्र असे करा: की राजांना बाजूला काढा व त्यांच्या जागी इतर राज्यपालांची नेमणूक करा. तुमचे जे सैन्य नष्ट झाले, त्यासारखे दुसरे सैन्य; घोड्यासाठी घोडा व रथासाठी रथ तयार करा; म्हणजे आपण मैदानावर इस्राएलशी लढू शकू आणि खचितच आपण त्यांच्यापेक्षा अधिक प्रबळ होऊ.” त्यांच्याशी सहमत होऊन त्यानुसार त्याने केले. पुढील वसंतॠतूत बेन-हदादने अरामी लोकांना जमा केले आणि ते इस्राएलशी लढण्यास अफेक येथे गेले. जेव्हा इस्राएली लोकसुद्धा एकत्र होऊन आपला अन्नसामुग्रींचा पुरवठा करून त्यांचा सामना करण्यास निघाले. इस्राएली लोकांनी शेळ्यांच्या दोन लहान कळपांप्रमाणे त्यांच्यासमोर तळ दिला आणि अरामी लोकांनी सर्व प्रदेशाला व्यापून टाकले होते. परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ” सात दिवसापर्यंत त्यांनी एकमेकांसमोर तळ दिला आणि सातव्या दिवशी लढाई सुरू झाली. इस्राएली लोकांनी एका दिवसात एक लाख अरामी पायदळी सैन्याला मारून टाकले. बाकीचे लोक अफेक शहरात पळून गेले, तिथे सत्तावीस हजार लोकांवर भिंत कोसळून पडली आणि बेन-हदाद शहरात पळून जाऊन एका आतील खोलीत लपून राहिला. त्याचे अधिकारी त्याला म्हणाले, “पाहा, आम्ही असे ऐकले आहे की इस्राएली राजे फार दयाळू असतात. तर आपण आपल्या कंबरेस गोणपाट नेसून आणि आपल्या डोक्याला दोरी बांधून इस्राएलच्या राजाकडे जाऊ, कदाचित तो तुझा जीव वाचवेल.” तेव्हा आपल्या कंबरेला गोणपाट नेसून व डोक्याला दोरी बांधून, ते इस्राएलच्या राजाकडे गेले व म्हणाले, “आपला सेवक बेन-हदाद म्हणतो: ‘कृपया मला जीवनदान द्यावे.’ ” राजाने म्हटले, “तो अजूनही जिवंत आहे काय? तो तर माझा भाऊ आहे.” त्या माणसांनी हे चांगले चिन्ह असे समजून अहाबाचा शब्द चटकन पकडून ते म्हणाले, “होय, आपला भाऊ बेन-हदाद!” राजाने म्हटले, “जा आणि त्याला घेऊन या,” जेव्हा बेन-हदाद बाहेर आला, अहाबाने त्याला आपल्या रथात घेतले. बेन-हदाद म्हणाला, “माझ्या पित्याने जी शहरे आपल्या पित्याकडून घेतली ती सर्व मी आपणास परत करेन. माझ्या पित्याने जशा शोमरोनात वसविल्या तशाच बाजारपेठा आपण दिमिष्कात वसवा.” अहाब म्हणाला, “या करारावर मी तुला मोकळे करतो.” म्हणून त्याने त्याच्याशी करार केला व त्याला सोडून दिले. याहवेहच्या शब्दानुसार संदेष्ट्यांच्या एका मंडळीतील एक संदेष्टा आपल्या साथीदाराला म्हणाला, “आपल्या शस्त्राने माझ्यावर वार कर,” परंतु त्याने नकार दिला. तेव्हा संदेष्टा म्हणाला, “कारण तू याहवेहचा शब्द मानला नाहीस, तू माझ्यापासून जाताच एक सिंह तुला मारून टाकील.” आणि तो मनुष्य जाताच सिंहाने त्याला गाठले व मारून टाकले. मग संदेष्ट्याने आणखी एका मनुष्याला म्हटले, “कृपया माझ्यावर वार कर.” तेव्हा त्या मनुष्याने त्याच्यावर वार करून त्याला जखमी केले. नंतर संदेष्टा जाऊन राजाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभा राहिला. त्याने आपल्या पागोट्याने आपले डोळे झाकून घेऊन आपले रूप बदलले होते. राजा जवळून जात असता, संदेष्ट्याने त्याला हाक मारीत म्हटले, “आपला सेवक युद्धभूमीवर गेला असता, एक मनुष्य एका कैद्याला माझ्याकडे घेऊन आला व म्हणाला, ‘या माणसावर लक्ष ठेव, तो जर गायब झाला, तर त्याच्या जिवासाठी तुला आपला जीव द्यावा लागेल, नाहीतर त्याचा मोबदला म्हणून तुला चांदीचा एक तालांत भरावा लागेल.’ आपला सेवक इकडे तिकडे व्यस्त असताना, तो मनुष्य गायब झाला.” “आपली शिक्षा हीच असणार,” इस्राएलचा राजा म्हणाला. “तू आपल्याच मुखाने ती सांगितली आहे.” तेव्हा संदेष्ट्याने चटकन आपल्या डोळ्यांवरील पागोटाची पट्टी काढली, आणि तो संदेष्ट्यांपैकी एक आहे असे इस्राएलच्या राजाने ओळखले. संदेष्टा राजाला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘ज्या मनुष्याने मरावे असे मी योजले होते, त्याला तू मोकळे सोडले आहे. त्यामुळे त्याच्या जिवाबद्दल तुझा जीव, त्याच्या लोकांसाठी तुझे लोक जातील.’ ” तेव्हा इस्राएलचा राजा खिन्न व रागाने भरून शोमरोनातील आपल्या राजवाड्याकडे गेला.