१ राजे 2:10-12
१ राजे 2:10-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर दावीद आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्याला दावीदपुरात मूठमाती दिली. दाविदाने इस्राएलावर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनात व तेहेतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले. मग शलमोन आपला बाप दावीद ह्याच्या गादीवर बसला. त्याने आपल्या राज्याला चांगली बळकटी आणली.
१ राजे 2:10-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग दावीद मरण पावला. त्याच्या पुर्वजांसारखे दावीद नगरात त्याचे दफन झाले. हेब्रोनवर सात वर्ष आणि यरूशलेम येथे तेहतीस वर्ष असे एकंदर चाळीस वर्षे दाविदाने इस्राएलावर राज्य केले. आता शलमोन आपल्या वडिलांच्या दाविदाच्या राजासनावर बसला. व त्याची सत्ता बळकटीने स्थापन झाली.
१ राजे 2:10-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यानंतर दावीद त्याच्या पूर्वजांसोबत विसावला आणि दावीदाच्या नगरात त्याला पुरले गेले. दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले. मग शलोमोन आपला पिता दावीद याच्या राजासनावर बसला आणि त्याचे राज्य बळकट असे स्थापित झाले.