१ राजे 18:43-44
१ राजे 18:43-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने आपल्या चाकराला सांगितले, “वर चढ; समुद्राकडे दृष्टी लाव.” त्याने जाऊन तसे केले आणि म्हटले, “काही दिसत नाही.” एलिया म्हणाला, “आणखी सात वेळा जा.” सातव्या खेपेस तो म्हणाला, “पाहा, समुद्रातून मनुष्याच्या हाताएवढा एक लहानसा ढग वर येत आहे.” एलीया म्हणाला, “अहाबाकडे जाऊन सांग, रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही.”
१ राजे 18:43-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आपल्याबरोबरच्या सेवकाला म्हणाला, “समुद्राकडे पाहा” समुद्र दिसेल अशा जागी हा सेवक गेला पण परत येऊन म्हणाला, “तिथे काहीच दिसले नाही” एलीयाने त्यास पुन्हा सात वेळेस जाऊन पाहायला सांगितले. सातव्यांदा मात्र सेवक परत येऊन म्हणाला, एक लहानसा, मुठीएवढा ढग मला दिसला. समुद्रावरुन तो येत होता तेव्हा एलीयाने त्या सेवकाला सांगितले, “अहाब राजाकडे जाऊन त्यास रथात बसून ताबडतोब घरी जायला सांग. कारण तो आत्ता निघाला नाहीतर पावसामुळे त्यास थांबावे लागेल.”