YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 2:3-11

1 योहान 2:3-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्यास खऱ्या अर्थाने ओळखले आहे. जो कोणी असे म्हणतो, “मी देवाला ओळखतो!” परंतु त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो खोटे बोलत आहे; आणि त्याच्याठायी सत्य नाही. पण जर कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तर त्यांच्यामध्ये देवाची प्रीती पूर्णत्वास गेली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याठायी आहोत. मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशू ख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे. प्रियांनो, मी तुम्हास नवी आज्ञा लिहीत नाही, परंतु जी आज्ञा तुम्हास आरंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो; जे वचन तुम्ही ऐकले ते ती जुनी आज्ञा होय. तरीही मी एकप्रकारे नवी आज्ञा लिहीत आहे. ती ख्रिस्तात आणि तुमच्यात सत्य आहे कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या भावांचा द्वेष करतो तो अजून अंधारांतच आहे. जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये अडखळण्याचे कारण नसते. पण जो आपल्या भावाचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्यास कळत नाही कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.

सामायिक करा
1 योहान 2 वाचा

1 योहान 2:3-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आपल्याला हे माहीत आहे की, जर आपण परमेश्वराच्या आज्ञा पाळतो तर आपल्याला त्यांची ओळख झाली आहे. जो कोणी असे म्हणतो की, “मी त्यांना ओळखतो,” परंतु त्यांच्या आज्ञांचे पालन करीत नाही तर तो लबाड आहे आणि सत्य त्या व्यक्तिमध्ये नाही. परंतु जर कोणी त्यांचे वचन पाळतो, तर परमेश्वरासाठी त्यांची प्रीती खरोखर त्यांच्यामध्ये पूर्ण झाली आहे. यावरून आपणास समजते की आपण त्यांच्यामध्ये आहोत. जो कोणी असा दावा करतो की तो त्यांच्यामध्ये राहतो त्याने जसे येशू राहिले तसे राहिले पाहिजे. प्रिय बंधुंनो, मी काही तुम्हाला नवीन आज्ञा लिहून देत आहे असे नाही, तर ही जुनीच आहे, जी सुरुवातीपासून दिलेली आहे. ही जुनी आज्ञा जो एक संदेश आहे तो तुम्ही ऐकलेला आहे, तरी मी तुम्हास एक नवी आज्ञा लिहित आहे; तिचे सत्य त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये दिसून येत आहे, कारण अंधकार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आत्ताच प्रकाशित झाला आहे. जर कोणी प्रकाशामध्ये आहे असा दावा करतो, परंतु आपल्या बंधू किंवा भगिनीचा द्वेष करतो तर तो अजूनही अंधकारातच आहे. जो कोणी आपल्या बंधू आणि भगिनीवर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो, आणि त्याच्यामध्ये असे काहीच नाही की ज्यामुळे ते अडखळतील. परंतु जर कोणी आपल्या बंधू व भगिनीचा द्वेष करतो तो अंधकारात राहतो आणि अंधारात चालतो. ते कोठे जातात हे त्यांना कळत नाही, कारण अंधाराने त्यांना आंधळे केले आहे.

सामायिक करा
1 योहान 2 वाचा

1 योहान 2:3-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांस कळून येते की, आपण त्याला ओळखतो. “मी त्याला ओळखतो” असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्या ठायी आहोत. मी त्याच्या ठायी राहतो, असे म्हणणार्‍याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. प्रियजनहो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही; परंतु जी आज्ञा तुम्हांला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो; जे वचन तुम्ही ऐकले ते ती जुनी आज्ञा होय. तरी एक प्रकारे मी तुम्हांला नवी आज्ञा लिहितो. ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे; कारण अंधार नाहीसा होत आहे, व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो, आणि त्याच्या ठायी अडखळण नसते; पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो; तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.

सामायिक करा
1 योहान 2 वाचा

1 योहान 2:3-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

आपण देवाच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपल्याला खातरीने कळून येते की, आपण त्याला ओळखतो. “मी त्याला ओळखतो”, असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्यामध्ये सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याशी एकनिष्ठ आहोत. “मी त्याच्याशी एकनिष्ठ राहतो”, असे म्हणणाऱ्याने येशू ख्रिस्त जसा चालला, तसे स्वतःही चालले पाहिजे. प्रियजनहो, मी तुम्हांला नवी आज्ञा लिहीत नाही, परंतु जी आज्ञा तुम्हांला प्रारंभापासून देण्यात आली आहे, तीच जुनी आज्ञा लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले, ते ती जुनी आज्ञा होय. तरी एक प्रकारे मी तुम्हांला नवी आज्ञा लिहितो. ती ख्रिस्ताच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशी आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता उजळत आहे. “मी प्रकाशात आहे”, असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि तो कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांना पापास प्रवृत्त करत नाही. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे, अंधारात चालतो आणि तो कोठे चालला आहे, हे त्याचे त्यालाच कळत नाही, कारण अंधाराने त्याच्या डोळ्यांवर अंधत्व आणलेले आहे.

सामायिक करा
1 योहान 2 वाचा