1 योहान 1:8-9
1 योहान 1:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
1 योहान 1:8-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर आम्ही पापविरहित आहो, असे आपण म्हणतो, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आमच्यामध्ये सत्य नाही. जर आपण आपली पापे त्याच्याजवळ कबूल करतो, तर ते विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करतील, आणि सर्व अनीतिमत्वापासून आपल्याला शुद्ध करतील.
1 योहान 1:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
1 योहान 1:8-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आपल्यामध्ये पाप नाही, असे जर आपण म्हणतो, तर आपण स्वतःला फसवितो व आपल्यामध्ये सत्य नाही. मात्र जर आपण आपली पापे कबूल केली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करील व सर्व अनीतिमत्त्वापासून आपल्याला शुद्ध करील.