YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 1:5-10

1 योहान 1:5-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तोच आम्ही तुम्हास सांगत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही. जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही तर आम्ही त्यास लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.

सामायिक करा
1 योहान 1 वाचा

1 योहान 1:5-10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हा संदेश आम्ही त्यांच्याकडून ऐकला आहे आणि तो तुम्हाला घोषित करतो, परमेश्वर प्रकाश आहे; त्यांच्यामध्ये अजिबात अंधार नाही. जर आम्ही असे म्हणतो की, आमची त्यांच्याबरोबर सहभागिता आहे आणि तरीसुद्धा अंधारात राहतो तर आम्ही खोटे बोलतो आणि खरेपणाने जगत नाही. परंतु जसे ते प्रकाशात आहेत, तसे आम्ही प्रकाशामध्ये चाललो, तर आमची एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्यांचा पुत्र येशू यांचे रक्त सर्व पापापासून आम्हाला शुद्ध करते. जर आम्ही पापविरहित आहो, असे आपण म्हणतो, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आमच्यामध्ये सत्य नाही. जर आपण आपली पापे त्याच्याजवळ कबूल करतो, तर ते विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करतील, आणि सर्व अनीतिमत्वापासून आपल्याला शुद्ध करतील. जर आपण म्हणतो की, आपण पाप केले नाही, तर आपण परमेश्वराला लबाड ठरवितो आणि त्यांचे वचन आपल्यामध्ये नाही.

सामायिक करा
1 योहान 1 वाचा

1 योहान 1:5-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हांला विदित करतो; तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो, तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही; पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही.

सामायिक करा
1 योहान 1 वाचा

1 योहान 1:5-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

जो संदेश आम्ही त्याच्याकडून ऐकला आहे, तो तुम्हांला जाहीर करतो. तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे, असे जर आपण म्हणतो व अंधारात चालतो, तर आपण खोटे बोलतो; सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे, तसे जर आपण प्रकाशात असलो, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आपल्यामध्ये पाप नाही, असे जर आपण म्हणतो, तर आपण स्वतःला फसवितो व आपल्यामध्ये सत्य नाही. मात्र जर आपण आपली पापे कबूल केली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करील व सर्व अनीतिमत्त्वापासून आपल्याला शुद्ध करील. आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण देवाला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्यामध्ये नाही.

सामायिक करा
1 योहान 1 वाचा