१ करिंथ 9:24-25
१ करिंथ 9:24-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण पारितोषिक एकालाच मिळते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर मग असे धावा की, तुम्हांला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो.
१ करिंथ 9:24-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की, ते तुम्ही मिळवाल. स्पर्धेसाठी मेहनत करणारा प्रत्येक मनुष्य प्रत्येक गोष्टीत संयमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळविण्यासाठी करतात, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो.
१ करिंथ 9:24-25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शर्यतीत प्रत्येकजण धावतो, परंतु फक्त एकाच व्यक्तीला बक्षीस मिळते हे तुम्हाला माहीत नाही का? अशा रीतीने धावा की ते बक्षीस तुम्हाला मिळेल. जो कोणी क्रीडास्पर्धेत भाग घेतो, त्या प्रत्येकाला कडक रीतीने प्रशिक्षण घ्यावे लागते. ते विनाशी मुगूट मिळविण्यासाठी करतात, परंतु आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी तसे करतो.
१ करिंथ 9:24-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण एकालाच बक्षीस मिळते हे तुम्हांला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हांला ते मिळेल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रियदमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो.