१ करिंथ 9:21-22
१ करिंथ 9:21-22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
(मी देवाच्या नियमाबाहेर नाही, पण ख्रिस्ताच्या नियमाखाली असल्यामुळे) मी नियमशास्त्राधीन नसलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन नसलेल्यांना नियमशास्त्राधीन नसल्यासारखा झालो. आणि मी दुर्बळ असलेले मिळविण्यास, दुर्बळांना दुर्बळासारखा झालो. मी सर्वांना सर्व झालो आहे, म्हणजे सर्वकाही करून मी कित्येकांचे तारण करावे.
१ करिंथ 9:21-22 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्यांना नियमशास्त्र नाही, त्यांना जिंकून घेता यावे म्हणून मीही त्यांच्यासाठी नियमशास्त्र नसल्यासारखा झालो. परमेश्वराच्या नियमांपासून मी बंधमुक्त नाही परंतु ख्रिस्ताच्या नियमांनी बांधला गेलो आहे. जे अशक्त आहेत त्यांना जिंकण्यासाठी मी अशक्त झालो. मी सर्व लोकांसाठी सर्वकाही झालो आहे, यासाठी की मी कसेही करून काहींचे तारण साधावे
१ करिंथ 9:21-22 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
जे नियमशास्त्रविरहित आहेत त्यांना मिळवण्यासाठी, म्हणजे नियमशास्त्र नाही अशांना मी नियमशास्त्रविरहित असा झालो. तरी देवाच्या नियमांबाहेर होतो असे नाही, तर ख्रिस्ताच्या नियमांच्या अधीन होतो. दुर्बळांना मिळवण्यासाठी दुर्बळांना मी दुर्बळ झालो. मी सर्वांना सर्वकाही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे.
१ करिंथ 9:21-22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जे नियमशास्त्राच्या बाहेर आहेत त्यांना मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राच्या बाहेर असा झालो. मी देवाच्या नियमांबाहेर होतो असे नाही, तर मी ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन होतो. दुर्बलांना मिळवण्यासाठी मी दुर्बल झालो. मी सर्व प्रकारे कित्येक जणांचे तारण साधावे म्हणून मी सर्वांसाठी सर्व काही झालो आहे.