१ करिंथ 7:32-33
१ करिंथ 7:32-33 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तुम्ही निश्चित असावे अशी माझी इच्छा आहे. जो अविवाहित आहे तो प्रभूच्या गोष्टींची, म्हणजे आपण प्रभूला कसे संतुष्ट करावे याची काळजी करतो; पण जो विवाहित आहे तो जगातल्या गोष्टींची, म्हणजे पत्नीला कसे संतुष्ट करावे याची काळजी करतो.
१ करिंथ 7:32-33 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही चिंता विरहित असावे, अशी माझी इच्छा आहे. एखादा अविवाहित पुरुष प्रभूचे कार्य—प्रभूला कसे संतोषविता येईल, यासंबंधी काळजी करतो. तरी विवाहित पुरुष जगातील गोष्टींचा आणि आपल्या पत्नीला आनंदी कसे ठेवता येईल, याचा विचार करतो.
१ करिंथ 7:32-33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही निश्चिंत असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करतो; परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयी चिंता करतो. येणेकरून त्याचे मन द्विधा झालेले असते.
१ करिंथ 7:32-33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तुम्ही निश्चिंत असावे, अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभू कसा संतुष्ट होईल, अशी चिंता करतो. परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतुष्ट करावे, अशा भौतिक गोष्टींची चिंता करतो. ह्यामुळे त्याचे मन द्विधा झालेले असते.