१ करिंथ 7:12-13
१ करिंथ 7:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण इतरांना हे प्रभू सांगत नाही, पण मी सांगतो की, जर एखाद्या बंधूची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल आणि त्याच्याबरोबर राहण्यास तिची संमती असेल तर त्याने तिला सोडू नये. आणि एखाद्या स्त्रीचा पती विश्वास ठेवणारा झाला नसेल आणि तिच्याबरोबर राहण्यास त्याची संमती असेल तर तिने त्यास सोडू नये.
१ करिंथ 7:12-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इतरांना मी हे सांगतो (प्रभू नव्हे, पण मी): एखाद्या भावाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल आणि ती त्याच्या जवळच राहण्यास तयार असेल, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचा पती अविश्वासी असेल आणि तिच्याबरोबर राहण्यास तयार असेल, तर तिनेही त्याला घटस्फोट देऊ नये.
१ करिंथ 7:12-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर कोणाएका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर1 असली, आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला सोडू नये. आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर2 असून तिच्याजवळ राहायला राजी असेल तर त्याला तिने सोडू नये.
१ करिंथ 7:12-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर एका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर असली आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर असून तिच्याजवळ राहायला राजी असेल, तर त्याला तिने घटस्फोट देऊ नये.