YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 7:1-24

१ करिंथ 7:1-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्यांविषयी: पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे. तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे. एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला परीक्षेत पाडू नये. तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतो. पण मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे; तरी प्रत्येकाला ज्याचे-त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसर्‍याला दुसर्‍या प्रकारचे. जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, तुम्ही माझ्यासारखे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे. तथापि जर त्यांना संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे. परंतु ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो की, पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये; परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये. इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर कोणाएका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर1 असली, आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला सोडू नये. आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर2 असून तिच्याजवळ राहायला राजी असेल तर त्याला तिने सोडू नये. कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे; असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती; परंतु आता ती पवित्र आहेत. तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी होवो; अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही; देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे. कारण हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाही काय ठाऊक? तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे; आणि ह्याप्रमाणे मी सर्व मंडळ्यांना नियम लावून देतो. सुंता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुंता न झालेला असे होऊ नये. कोणा सुंता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुंता करून घेऊ नये. सुंता होणे काही नाही व सुंता न होणेही काही नाही; तर देवाच्या आज्ञा पाळणे हेच सर्वकाही आहे. ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल त्याने त्याच स्थितीत राहावे. तू गुलाम असता तुला पाचारण झाले काय? त्याची चिंता करू नकोस; पण तुला मोकळे होता येत असेल तर खुशाल मोकळा हो. कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे; तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; माणसांचे गुलाम होऊ नका. बंधुजनहो, ज्या स्थितीत कोणाला पाचारण झाले असेल त्या स्थितीतच तो देवाजवळ राहो.

सामायिक करा
१ करिंथ 7 वाचा

१ करिंथ 7:1-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; स्त्रीला स्पर्श न करणे हे पुरुषासाठी बरे आहे. तरीही व्यभिचार होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला आपली स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला आपला स्वतःचा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा; आणि त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला तिच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पतीला असतो; आणि त्याचप्रमाणे पतीलाही त्याच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पत्नीला असतो. विषयसुखासाठी एकमेकाला वंचित करू नका, तुम्हास प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास मोहात पाडू नये. पण मी हे संमती म्हणून सांगतो, आज्ञा म्हणून नाही. माझी इच्छा अशी आहे की, सर्व लोक माझ्यासारखे असावेत पण प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वतःचे असे देवापासून दान आहे. एकाला एका प्रकारे राहण्याचे आणि दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारे राहण्याचे. म्हणून मी सर्व अविवाहितांना आणि विधवांना असे म्हणतो की, तुम्ही माझ्याप्रमाणे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे आहे. तथापि जर त्यास संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे; कारण वासनेनी जळण्यापेक्षा लग्न करणे बरे. आणि विवाहितांना मी आज्ञा देत आहे, मी नाही पण प्रभू देत आहे की पत्नीने पतीला सोडू नये. पण, जर तिने सोडले तर लग्न न करता तसेच रहावे किंवा आपल्या पतीबरोबर समेट करावा आणि पतीने पत्नीला सोडू नये. पण इतरांना हे प्रभू सांगत नाही, पण मी सांगतो की, जर एखाद्या बंधूची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल आणि त्याच्याबरोबर राहण्यास तिची संमती असेल तर त्याने तिला सोडू नये. आणि एखाद्या स्त्रीचा पती विश्वास ठेवणारा झाला नसेल आणि तिच्याबरोबर राहण्यास त्याची संमती असेल तर तिने त्यास सोडू नये. कारण, विश्वास न ठेवणारा पती पत्नीमुळे पवित्र होतो आणि विश्वास न ठेवणारी पत्नी पतीमुळे पवित्र होते. नाही तर तुमची मुले अशुद्ध असती पण ती आता पवित्र आहेत. पण स्वतः विश्वास ठेवत नसल्यामुळे कोणी सोडून जात असेल तर जाऊ द्या; कारण कोणी बंधू किंवा बहीण अशा बाबतीत बंधनात नाही. पण देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता बोलावले आहे. कारण पत्नी, तू हे कशावरून जाणतेस की, तू आपल्या पतीला तारशील की नाही? किंवा तू, पती, हे कशावरून जाणतोस की, तू आपल्या पत्नीला तारशील की नाही? तर जसे प्रभूने प्रत्येकाला वाटून दिले आहे, जसे देवाने प्रत्येकाला बोलावले आहे, तसे त्याने चालावे आणि ह्याप्रमाणे, मी सर्व मंडळ्यांना आज्ञा देत आहे. सुंता झालेली असता कोणाला विश्वासासाठी पाचारण झाले काय? तर त्याने सुंतेचे चिन्ह काढून टाकू नये. बेसुंता असलेल्या कोणाला विश्वासासाठी पाचारण आहे? त्याने सुंता करून घेऊ नये. कारण सुंता झालेला असणे काही नाही किंवा बेसुंता असणे काही नाही; पण देवाच्या आज्ञांचे पालन करणे हे सर्वकाही आहे. ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल त्याने त्याच स्थितीत रहावे. तू दास असता बोलावला गेलास काय? त्याची पर्वा करू नकोस; पण तुला स्वतंत्र होता आले तर त्याचा उपयोग कर. कारण दास असता जो प्रभूत बोलावला गेला तो प्रभूचा स्वतंत्र मनुष्य आहे; त्याचप्रमाणे जो स्वतंत्र असता बोलावला गेला तो ख्रिस्ताचा दास आहे. देवाने तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे, म्हणून तुम्ही मनुष्यांचे दास होऊ नका. बंधूंनो जो ज्या स्थितीत बोलावला गेला आहे त्याने त्या स्थितीत देवाबरोबर रहावे.

सामायिक करा
१ करिंथ 7 वाचा

१ करिंथ 7:1-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आता ज्या गोष्टींविषयी तुम्ही मला लिहिले होते: “मनुष्याने स्त्रीशी लैंगिक संबंध न ठेवलेले बरे.” तरी जारकर्म वाढले आहे म्हणून प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी संबंध ठेवावे आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या पतीशी. विवाहित स्त्री म्हणून असलेले सर्व हक्क पुरुषाने आपल्या पत्नीला द्यावेत, आणि पत्नीनेही आपल्या पतीसाठी तसेच करावे. पत्नीच्या शरीरावर तिचा स्वतःचा अधिकार नाही तर, पतीचा असतो. त्याचप्रमाणे पतीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो तर तो त्याच्या पत्नीला असतो. एकमेकांची वंचना करू नका, पण प्रार्थनेला वेळ मिळावा म्हणून एकमेकांच्या संमतीने काही काळ अलिप्त राहा. पण तुम्ही पुन्हा एकत्र यावे म्हणजे आत्मसंयमनाच्या अभावी सैतान तुम्हाला मोहात पाडणार नाही. मी हे आज्ञारूपाने म्हणत नाही परंतु अनुमती म्हणून सांगतो. माझी इच्छा अशी आहे की, जसा मी आहे तसे तुम्ही सर्वांनी असावे. परंतु प्रत्येकाला परमेश्वराकडून देणगी मिळालेली आहे; एकास एक देणगी तर दुसर्‍यास दुसरी देणगी. म्हणून जे अविवाहित आहेत आणि ज्या विधवा आहेत, त्यांना मी सांगतो तुम्हीही जसा मी आहे तसे राहावे. पण तुम्हाला संयम राखता येत नसेल, तर विवाह केलेला बरा. वासनेने जळण्यापेक्षा विवाह करणे उत्तम. आता जे विवाहित आहेत, त्यांच्यासाठी मी एक आज्ञा देतो (मी नाही, पण प्रभू देतात) पत्नीने पतीपासून विभक्त होऊ नये. पण पत्नी विभक्त झाली असेल, तर तिने दुसरा विवाह करू नये किंवा आपल्या पतीशी समेट करावा. पतीनेही आपल्या पत्नीला घटस्फोट देऊ नये. इतरांना मी हे सांगतो (प्रभू नव्हे, पण मी): एखाद्या भावाची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल आणि ती त्याच्या जवळच राहण्यास तयार असेल, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीचा पती अविश्वासी असेल आणि तिच्याबरोबर राहण्यास तयार असेल, तर तिनेही त्याला घटस्फोट देऊ नये. कारण अविश्वासी पती, विश्वासी पत्नीच्याद्वारे पवित्र होऊ शकेल आणि अविश्वासी पत्नी, विश्वासी पतीद्वारे पवित्र होऊ शकेल. नाही तर तुमची लेकरे अशुद्ध असती, परंतु ती आता पवित्र आहेत. परंतु जर अविश्वासी व्यक्ती वेगळी होऊ इच्छित असेल तर तसे होऊ द्या. अशा परिस्थितीत भाऊ किंवा बहीण बांधलेले नाही; कारण परमेश्वराने आपल्याला पाचारण केले आहे ते यासाठी की आपण शांतीने राहावे. अहो पत्नींनो, तुमच्या पतींचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे? किंवा पतींनो तुमच्या पत्नीचे तारण तुमच्याद्वारे होईल किंवा नाही हे कसे समजावे? प्रत्येकाने विश्वासू व्यक्तीसारखे प्रभूने तुम्हाला ज्या स्थितीत ठेवले आहे व परमेश्वराने जसे पाचारण केले आहे तसे राहावे. सर्व मंडळ्यांसाठी माझा हाच नियम आहे. सुंता झालेल्या एखाद्या व्यक्तीस पाचारण झाले आहे काय? तर तुम्ही असुंती होऊ नये. तसेच सुंता न होण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीस पाचारण झाले आहे का? तर त्याने सुंता करून घेऊ नये. सुंतेचे काही महत्त्व नाही व असुंतेचेही नाही. परंतु परमेश्वराच्या आज्ञा पाळणे हेच महत्त्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला परमेश्वराने पाचारण केले, त्यावेळी ज्या स्थितीत ते होते तसेच त्यांनी राहवे. तुम्ही गुलाम असताना पाचारण झाले काय? त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. पण तुम्हाला स्वतंत्र होणे शक्य असेल तर अवश्य व्हा. जर कोणी गुलाम असताना, प्रभूने तुम्हाला विश्वासात पाचारण केले, तर तुम्ही प्रभूमध्ये स्वतंत्र केलेली व्यक्ती आहात. त्याचप्रमाणे, जो स्वतंत्र असून पाचारलेला आहे तो ख्रिस्ताचा गुलाम आहे. तुम्हाला किंमत भरून विकत घेण्यात आले आहे; म्हणून तुम्ही माणसांचे गुलाम होऊ नका. माझ्या बंधूंनो व भगिनींनो, प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने पाचारण केले होते तेव्हा ज्या स्थितीत ते होते त्याच स्थितीत त्यांनी परमेश्वराला जोडलेले असावे.

सामायिक करा
१ करिंथ 7 वाचा

१ करिंथ 7:1-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्यांविषयी: पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे. तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे. एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला परीक्षेत पाडू नये. तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतो. पण मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे; तरी प्रत्येकाला ज्याचे-त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसर्‍याला दुसर्‍या प्रकारचे. जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, तुम्ही माझ्यासारखे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे. तथापि जर त्यांना संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे. परंतु ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो की, पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये; परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये. इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर कोणाएका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर1 असली, आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला सोडू नये. आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर2 असून तिच्याजवळ राहायला राजी असेल तर त्याला तिने सोडू नये. कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे; असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती; परंतु आता ती पवित्र आहेत. तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी होवो; अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही; देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे. कारण हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाही काय ठाऊक? तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे; आणि ह्याप्रमाणे मी सर्व मंडळ्यांना नियम लावून देतो. सुंता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुंता न झालेला असे होऊ नये. कोणा सुंता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुंता करून घेऊ नये. सुंता होणे काही नाही व सुंता न होणेही काही नाही; तर देवाच्या आज्ञा पाळणे हेच सर्वकाही आहे. ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल त्याने त्याच स्थितीत राहावे. तू गुलाम असता तुला पाचारण झाले काय? त्याची चिंता करू नकोस; पण तुला मोकळे होता येत असेल तर खुशाल मोकळा हो. कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे; तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; माणसांचे गुलाम होऊ नका. बंधुजनहो, ज्या स्थितीत कोणाला पाचारण झाले असेल त्या स्थितीतच तो देवाजवळ राहो.

सामायिक करा
१ करिंथ 7 वाचा

१ करिंथ 7:1-24 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्यांविषयी मी उत्तर देत आहे. पुरुषाने स्त्रीला स्पर्श न क रणे बरे. परंतु अनैतिकता इतकी बोकाळत आहे म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा व एकमेकांचे समाधान करावे. पत्नीला स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे आणि त्याचप्रमाणे पतीलाही स्वतःच्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे. एकमेकांना नकार देऊ नका, तरी प्रार्थना करता यावी म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला मोहात पाडू नये. मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर एक सवलत म्हणून सांगतो. खरे म्हणजे मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे, अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवाकडून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे. आता जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, माझ्यासारखे एकटे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे. तथापि जर तुम्हांला संयम बाळगता येत नसेल, तर तुम्ही लग्न केलेले बरे. कामवासनेने जळत राहण्यापेक्षा लग्न करणे चांगले आहे. परंतु विवाहितांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो की, पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये. परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये. इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर एका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर असली आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला घटस्फोट देऊ नये आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर असून तिच्याजवळ राहायला राजी असेल, तर त्याला तिने घटस्फोट देऊ नये. कारण पत्नीच्याद्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्याद्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे. असे नसते तर त्यांची मुलेबाळे अपवित्र असती. परंतु आता ती पवित्र आहेत. तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते, तर ती वेगळी होवो, अशा प्रसंगी ख्रिस्ती बंधू किंवा भगिनी बांधील नाहीत. देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे; कारण पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक? किंवा पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही, हे तुला काय ठाऊक? ते काहीही असो, प्रत्येकाला प्रभूने नेमून दिलेले जीवन आणि प्रत्येकाला देवाने केलेले पाचारण ह्यानुसार त्याने चालावे. सर्व ख्रिस्तमंडळ्यांना मी हाच नियम घालून देतो. सुंता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंतेच्या खुणा काढून टाकू नयेत; कोणा सुंता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले आहे काय? तर त्याने सुंता करून घेऊ नये. सुंता होणे किंवा सुंता न होणे ह्याला काही महत्त्व नाही तर देवाच्या आज्ञा पाळणे, हेच सर्वांत महत्त्वाचे आहे. ज्याला ज्या स्थितीत पाचारण झाले असेल, त्याने त्याच स्थितीत राहावे. तू गुलाम असता, तुला पाचारण झाले आहे काय? हरकत नाही, पण तुला स्वतंत्र होता येत असेल तर खुशाल स्वतंत्र हो; कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले आहे, तो गुलामगिरीतून स्वतंत्र केलेला प्रभूचा मनुष्य आहे. तसेच स्वतंत्र असताना ज्याला पाचारण झाले आहे तो ख्रिस्ताचा दास आहे. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून माणसांचे गुलाम होऊ नका. बंधुजनहो, ज्या स्थितीत पाचारण झाले असेल त्या स्थितीतच प्रत्येकाने देवाच्या सहवासात राहावे.

सामायिक करा
१ करिंथ 7 वाचा