१ करिंथ 3:9-11
१ करिंथ 3:9-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात. देवाच्या कृपेद्वारे जे मला दिले आहे त्याप्रमाणे मी सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधीत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत, ह्याविषयी प्रत्येकाने काळजी घ्यावी. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया आहे, त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही.
१ करिंथ 3:9-11 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहो. तुम्ही परमेश्वराचे शेत आहा, परमेश्वराची इमारत आहा. परमेश्वराने जी कृपा मला दिली आहे, त्यानुसार मी कुशल बांधकाम करणार्यासारखा पाया घातला आणि आणखी कोणी त्यावर बांधकाम करीत आहे. परंतु प्रत्येकाने बांधकाम काळजीपूर्वक केले पाहिजे. जो पाया अगोदरच घातलेला आहे, जे स्वतः येशू ख्रिस्त आहे, त्याव्यतिरीक्त दुसरा पाया कोणालाही घालता येणार नाही.
१ करिंथ 3:9-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत; तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला; आणि दुसरा त्यावर इमारत बांधत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत ह्याविषयी प्रत्येकाने जपावे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही.
१ करिंथ 3:9-11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. माझ्यावर झालेल्या देवाच्या कृपेच्या परिमाणाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधकाम करत आहे. मात्र त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत, ह्याविषयी प्रत्येक कामगाराने दक्षअसले पाहिजे. येशू ख्रिस्त हा पाया आहे, त्याच्यावाचून दुसरा पाया नाही.