YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 3:3-9

१ करिंथ 3:3-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

तुम्ही अजूनसुद्धा दैहिक आहात कारण तुमच्यात मत्सर व भांडणे चालू आहेत, तर तुम्ही दैहिक नाहीत काय व जगातील लोकांसारखे चालत नाही काय? कारण जेव्हा एक म्हणतो, “मी पौलाचा आहे,” आणि दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे,” तेव्हा तुम्ही साधारण मानवच आहात की नाही? तर मग अपुल्लोस कोण आहे? आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, प्रत्येकाला प्रभूने जे काम नेमून दिले त्याप्रमाणे ते आहेत. मी बी लावले, अपुल्लोसाने त्यास पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. तर मग लावणारा काही नाही किंवा पाणी घालणाराही काही नाही, पण वाढविणारा देव हाच काय तो आहे. जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत आणि प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजूरी मिळेल. कारण अपुल्लोस आणि मी देवाच्या सेवाकार्यात सहकर्मी आहोत. तुम्ही देवाचे शेत आहात व देवाची इमारत आहात.

सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा

१ करिंथ 3:3-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुम्ही अजूनही दैहिक आहात. तुम्हामध्ये भांडणे आणि मत्सर आहेत, तुम्ही दैहिक आहात की नाही? तुम्ही केवळ सामान्य मानवासारखे वागता की नाही? तुमच्यातील एकजण म्हणतो, “मी पौलाचा अनुयायी आहे” आणि दुसरा “मी अपुल्लोसाचा अनुयायी आहे,” यावरून तुम्ही सामान्य मनुष्य आहात नाही काय? तर मग काय, अपुल्लोस तरी कोण आहे? मी पौल कोण आहे? आम्ही तर केवळ परमेश्वराचे सेवक, त्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला—प्रभूने प्रत्येकाला कामगिरी सोपवून दिली होती. मी बी पेरले, अपुल्लोसाने पाणी घातले, परंतु परमेश्वराने वाढविले. पेरणारा किंवा पाणी घालणारा कोणी काही नाही, तर फक्त परमेश्वरच जे त्याची वाढ करतात. जो पेरतो व जो पाणी घालतो त्यांचा हेतू एकच आहे आणि त्या दोघांनाही त्यांच्या श्रमाचे प्रतिफळ मिळेल. आम्ही परमेश्वराच्या सेवेतील सहकारी आहोत. तुम्ही परमेश्वराचे शेत आहात, परमेश्वराची इमारत आहात.

सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा

१ करिंथ 3:3-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

कारण तुम्ही अजूनही दैहिक आहात; ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही? व मानवी रीतीने चालता की नाही? कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलाचा आहे;” दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसाचा आहे;” तेव्हा तुम्ही (दैहिक) मानवच आहात की नाही? अपुल्लोस कोण? आणि पौल कोण? ज्यांच्या द्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत; ज्याला-त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही; तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत; तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात.

सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा

१ करिंथ 3:3-9 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तुम्ही अजूनही ऐहिक लोकांसारखे आहात. ज्याअर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्याअर्थी तुम्ही दैहिक आहात की नाही व मानवी प्रवृत्तीने चालता की नाही? कारण जेव्हा एखादा म्हणतो, “मी पौलाचा आहे,” दुसरा म्हणतो, “मी अपुल्लोसचा आहे”, तेव्हा तुम्ही दैहिकच आहात की नाही? तर मग अपुल्लोस कोण, पौल कोण? ज्यांच्याद्वारे तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, असे ते सेवक आहेत. ते प्रभूने नेमून दिल्याप्रमाणे आपले कार्य करीत आहेत. मी रोप लावले, अपुल्लोसने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली. त्यामुळे लावणारा आणि पाणी घालणारा महत्त्वाचा नाही, तर वाढवणारा देव हाच काय तो महत्त्वाचा आहे. लावणारा व पाणी घालणारा हे सारखेत आहेत, तरी देव प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे त्याची मजुरी देईल. आम्ही देवाचे सहकारी आहोत, तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात.

सामायिक करा
१ करिंथ 3 वाचा